Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश 'तिने' केला 20 किलोमीटर पाठलाग; तेव्हा बसली लग्नगाठ

‘तिने’ केला 20 किलोमीटर पाठलाग; तेव्हा बसली लग्नगाठ

Subscribe

एका वधूला कळलं की ज्या वराची तिचं संपूर्ण कुटुंब आणि समाजातील लोक वाट पाहत आहेत तो लग्नाच्या मंडपातून पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर त्या वधूने भावी नवऱ्याचा २० किलोमीटरपर्यंत पाठलाग केला आणि त्याला पकडले. तसचं, त्याला जवळच्या मंदिरात नेत त्याच्याशी लग्न केले.

उत्तर प्रदेशातील बरेली येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका वधूला कळलं की ज्या वराची तिचं संपूर्ण कुटुंब आणि समाजातील लोक वाट पाहत आहेत तो लग्नाच्या मंडपातून पळून जाण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर त्या वधूने भावी नवऱ्याचा २० किलोमीटरपर्यंत पाठलाग केला आणि त्याला पकडले. तसचं, त्याला जवळच्या मंदिरात नेत त्याच्याशी लग्न केले. मिळालेल्या माहितीनुसार, नववधू सोळा शृंगार करुन होणाऱ्या नवऱ्याची वाट पाहत बसली होती. परंतु नवरा मात्र पळून जाण्याच्या तयारीत होता. ( Uttar Pradesh the groom was running aways from wedding the bride chased him 20 Km and caught him and then got married )

नवरीच्या घरातील सदस्य लग्नाच्या तयारीत व्यस्त होते. सर्वांचे डोळे वरातीकडे लागले होते. मंडप सजला होता, लग्नाचे ठिकाण झेंडूच्या फुलांच्या माळांनी सजले होते, पण त्याच दरम्यान नवरा पळून जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर नवरीने पळून जाणाऱ्या नवऱ्याचा 20 किलोमीटरपर्यंत पाठलाग केला आणि त्याला पकडून जवळच्या मंदिरात नेऊन लग्न केले.

नेमकं प्रकरण काय?

- Advertisement -

तरुणी (वधू) आणि तरुण (वर) यांच्यात गेल्या अडीच वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. वर हा मूळचा बदाऊनचा आहे. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या संमतीने लग्नाची तारीखही निश्चित झाली. या रविवारी भूतेश्वरनाथ मंदिरात मुलीच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत लग्नाची सर्व तयारीही करण्यात आली होती. एकीकडे सोळा शृगांर करुन नवरी मुलगी म्हणून मंडपात वराची वाट पाहत होती, मात्र याच दरम्यान नवऱ्याचा काही विचार बदलला आणि त्याने मुलीशी लग्न करण्यास नकार देण्यास सुरुवात केली. नवरा पळून जाणार असल्याची माहिती वधूला कळताच नवरीने होणाऱ्या नवऱ्याला बोलावून घेतले. यानंतर तो बहाणे करू लागला आणि त्याने मी माझ्या आईला आणण्यासाठी बदाऊनला जात असल्याचं सांगितलं.

आपला प्रियकर आईला घेण्यासाठी बदाऊनला जात असल्याचे वधूला समजताच तो लग्नातून पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय तिला आला. हे ऐकून नववधूने त्याचा पाठलाग सुरू केला आणि बरेली शहरापासून सुमारे 20 किमी अंतरावर असलेल्या भामोरा पोलीस ठाण्यासमोर त्याला पकडले आणि बळजबरीने वराला बसमधून मंडपापर्यंत नेले आणि लग्नगाठ बांधली. तब्बल 2 तास हा सर्व प्रकार सुरु होता. हे सर्व पाहण्यासाठी तेथे गर्दीही जमली, नंतर घरच्यांशी बोलणे झाले, वडिलांनी समजूत काढली आणि भामोरा मंदिरातच दोघांचा विवाह झाला.

- Advertisement -

( हेही वाचा: संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचा वाद शिगेला, ‘या’ विरोधी पक्षांचा कार्यक्रमावर बहिष्कार )

कुटुंबीयांच्या संमतीनंतर हे विधी पार पडले. भामोरा येथे नवरीने प्रियकराला बसमध्ये पकडले. त्यामुळे यादरम्यान अनेक तास हायव्होल्टेज ड्रामा सुरू होता. त्यानंतर या प्रकरणात तरुण व तरुणीच्या कुटुंबीयांनी सहमती दर्शवून तडजोड करून भामोरा येथीलच एका मंदिरात विवाह सोहळा पार पाडून दोघांचा विवाह झाला.

- Advertisment -