घरदेश-विदेशकोरोनाचा बोगस रिपोर्ट पडला महागात, डेहराडूनला येताच गेले आत

कोरोनाचा बोगस रिपोर्ट पडला महागात, डेहराडूनला येताच गेले आत

Subscribe

कोरोना चाचणीचा बोगस रिपोर्ट असणाऱ्या तब्बल 13 पर्यटकांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्या विरुद्ध महामारी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या दिड वर्षापासून कोरोना व्हायरसमुळे सरकारने आखून दिलेल्या नियमाअंतर्गत अत्यावश्यक कर्मचारी व्यतीरीक्त इतर नागरीकांना बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. अशातच कोरोनाचे संकट काहीशा प्रमाणात कमी होत असताना अता पर्यटक उत्तराखंड मधील अनेक निसर्गरम्य मसुरी-देहरादून सारख्या पर्यटन स्थळांना भेट देण्यास बाहेर पडत असल्याचे दिसत आहे. यामुळे उत्तराखंडमध्ये सध्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. उत्तराखंडमध्ये येण्यापुर्वी पर्यटकांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह असणे अनिवार्य असल्याचे उत्तराखंड सरकारने सांगितले आहे. पण अनेक पर्यटक कोरोना चाचणीचा बोगस रीपोर्ट काढून फिरत असल्याचे पोलिसांना आढळून आले. कोरोना चाचणीचा बोगस रिपोर्ट असणाऱ्या तब्बल 13 पर्यटकांना पोलिसांनी अटक करुन त्यांच्या विरुद्ध महामारी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(uttarakhand dehradun tourist comes with fake corona negative report police arrest)

आशारोड़ी चेक पोस्ट स्थित आरटीओ बॅरियर जवळील एसओजी  टीम पर्यटकांची सखोल चौकशी करत आहेत. चेकिंग करतांना यूपीच्या गाडीत असणाऱ्या 10 लोकांना कोरोनाचा बोगस रीपोर्ट दाखवल्याने कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार हे सर्व पर्यटक गाजियाबाद आणि बिहार मधून उत्तराखंडमध्ये येत होते.

- Advertisement -
काय आहेत नियम?

कोरोना व्हायरस दरम्यान उत्तराखंडमध्ये पर्यटकांची वाढती गर्दी पाहता. उत्तराखंड सरकारने काही नवे नियम जाहिर केले आहे. या नियमाअंतर्गत हॅटेल रिजर्वेशन वीना तसेच कोरोनाचा नेगेटिव्ह रिपोर्ट नसल्यास कोणत्याही पर्यटकांना उत्तराखंडमध्ये येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.



हे हि वाचा – Liquor Price Hike: ‘या’ राज्यात आजपासून दारूचे दर वाढणार

- Advertisement -


 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -