घरदेश-विदेशदेशात वेगाने होणार 'Covaxin' चा पुरवठा; Bharat Biotech पाठवणार दिल्लीसह १४ राज्यांना...

देशात वेगाने होणार ‘Covaxin’ चा पुरवठा; Bharat Biotech पाठवणार दिल्लीसह १४ राज्यांना लस

Subscribe

भारतात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान, गेल्या काही दिवसांत देशाच्या लसीकरणाचा वेग कमी झाला होती. राज्यांना पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्याने आणि अपुऱ्या लसींचा पुरवठा हे या मागील मुख्य कारण होते. परंतु आता ही समस्या लवकरच दूर होणार आहे, कारण यापुढे लसींच्या पुरवठ्यासाठी राज्यांना केंद्रावर अवलंबून राहावे लागणार नसल्याचे सांगितले जात आहे. भारत बायोटेकने म्हटले की, त्यांनी दिल्लीसह १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना थेट कोरना लसी पाठविणे सुरू केले आहे. Covaxin तयार करणार्‍या भारत बायोटेकने असेही सांगितले की, १ मेपासून राज्यांना लस पुरवठा सुरू देखील केला आहे.

कंपनीच्या सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इला यांच्या मते, भारत बायोटेकने १ मेपासून दिल्ली आणि महाराष्ट्रासह १४ राज्यांना कोरोनाच्या Covaxin या लसीचा थेट पुरवठा सुरू केला आहे. हैदराबादस्थित कंपनीने केंद्र सरकारला मिळालेल्या लोकेशनच्या आधारे त्यांनी कोरोनाची ही लस पुरवण्यास सुरवात केली आहे. कंपनीने आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, गुजरात, जम्मू-काश्मीर, झारखंड, मध्य प्रदेश, ओडिशा, तमिळनाडू, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल येथे लसींचा साठा पाठविला आहे. दरम्याम, २९ एप्रिल रोजी भारत बायोटेकने राज्यांसाठी ‘Covaxin’ च्या किंमतीत कपात करण्याची घोषणा केली, जी आधी प्रति डोस ६०० रुपये होती, नंतर ती कमी करुन ४०० रुपये प्रति डोस करण्यात आली आहे.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना लसींचा १ कोटींपेक्षा जास्त लसींचा डोस आहे आणि येत्या तीन दिवसांत त्यांना अतिरिक्त नऊ लाख डोस देण्यात येतील. यासह असेही म्हटले की, केंद्राने आतापर्यंत राज्य व केंद्रशासित प्रदेशांना कोरोना विरूद्ध लढण्यासाठी कोरोना लसीचे डोस १७ कोटी ९३ लाख ५७ हजार ८६० डोस विनामूल्य दिले आहेत.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -