घरताज्या घडामोडीलोककलावंतांना आर्थिक सहकार्यासाठी शासनाचा पुढाकार, सर्वेक्षण करून प्रस्तावाची अमित देशमुखांची सूचना

लोककलावंतांना आर्थिक सहकार्यासाठी शासनाचा पुढाकार, सर्वेक्षण करून प्रस्तावाची अमित देशमुखांची सूचना

Subscribe

कलावंतांना आर्थिक सहकार्य कसे करता येईल याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून यासाठी जिल्हाधिकारी यांची मदत घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील लोककलावंतांचे सर्वेक्षण करण्याची सूचना केली.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन केला आहे. या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य ते लोककलावंत अशा सर्वच गटातील नागरिकांना आर्थिक अडचणींना समाोरे जावे लागत आहे. लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासन सकारात्मक, सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. तसेच कलावंतांना आर्थिक सहकार्य कसे करता येईल याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून सर्वेक्षणाच्या सुचना राज्याचे सार्वजनिक सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत.

लोककलावंतांना अर्थिक सहाय्य करण्यासाठी यासाठी जिल्हाधिकारी यांची मदत घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील लोककलावंतांचे सर्वेक्षण करण्याची सूचना देण्यात आली आहे. याबाबत राज्याचे सार्वजनिक सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. कलावंतांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींना समवेत आज ऑनलाइन बैठक घेण्यात आली होती. बैठकीत अमित देशमुख यांनी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधला.

- Advertisement -

कोविडचा संसर्ग वाढू नये यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घालण्यात आली होती. यामुळे अनेक लोक कलावंतांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हे सर्व लक्षात घेऊन त्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत राज्य शासन प्रयत्न करीत आहे. कलावंतांना आर्थिक सहकार्य कसे करता येईल याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात येत असून यासाठी जिल्हाधिकारी यांची मदत घेऊन प्रत्येक जिल्ह्यातील लोककलावंतांचे सर्वेक्षण करण्याची सूचना केली. मंजूर केलेले अर्थसहाय्य थेट या लोककलावंतांच्या खात्यात डीबीटी द्वारे जमा होणार असल्याची माहिती अमित देशमुख यांनी दिली आहे.

- Advertisement -

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. हतावर पोट असलेल्या लोककलावंतांवर या लॉकडाऊनमुळे आता उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लोककलावंतांचे कार्यक्रम आणि मानधन येणे बंद झाले असल्यामुळे या कलावंतांवर आर्थिक संकट आले आहे. अनेक कलावंतांचे घर हे कार्यक्रमात मिळालेल्या मानधनावर चालत होते. अशा कलावंतांवर आता मात्र उपासमारीची वेळ आली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -