घरदेश-विदेशVaishno Devi : वैष्णोदेवी यात्रेसाठी काय आहेत नियम? तरीही चेंगराचेंगरीची घटना का...

Vaishno Devi : वैष्णोदेवी यात्रेसाठी काय आहेत नियम? तरीही चेंगराचेंगरीची घटना का घडली?

Subscribe

वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावे लागते. कटरामध्ये यात्रा सुरु होण्यापूर्वी रजिस्ट्रेशन करावे लागते.

नवीन वर्षाची सुरुवात जम्मू काश्मीरमधील (Vaishno Devi Temple Stampede) अत्यंत वाईट घटनेने झाली आहे.  जम्मू काश्मीरच्या कटरामधील वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरीची भीषण घटना घडली आहे. या घटनेत आतापर्यंत १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर १४ हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. मात्र मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अनेक प्रक्रिया पार कराव्या लागतात. यात रजिस्ट्रेशनसह अनेक नियम ठरवून देण्यात आले आहे. परंतु वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी (Mata Vaishno Devi Bhawan) येणाऱ्या भाविकांसाठी नेमके नियम, रस्ता, प्रक्रिया, व्यवस्था काय आहेत हे जाणून घेऊ…

भाविकांना पहिल्यांदा करावे लागते रजिस्ट्रेशन

वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करावे लागते. कटरामध्ये यात्रा सुरु होण्यापूर्वी रजिस्ट्रेशन करावे लागते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. या रजिस्ट्रेशननंतर भाविकांना एक स्लिप मिळते. या स्लिपच्या आधारे भाविकांना ६ तासांच्या आत बाणगंगामध्ये पहिल्या चेक पोस्टला पोहचावे लागते. (Stampede at Mata Vaishno Devi Bhawa)

- Advertisement -

यात्रेसाठी दोन मार्ग

माता वैष्णोदेवीच्या यात्रेला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. हे मंदिर ५२०० फूट उंचावर स्थित आहे. यासाठी कटराहून १२ किमीच्या ट्रेकने जाण्याचा पर्याय आहे. रस्ता चांगला असल्याने ट्रेकने जाण्याचा पर्याय उत्तम आहे. मंदिरापर्यंतचा रस्ता अगदी उंच आणि सरळ असल्याने त्यावर चालणे कठीण होत आहे. यासाठी अनेक जण पायऱ्यांनी वर जाण्याचा पर्याय निवडतात. बहुतांश भाविक रात्रीच्या वेळेस यात्रेला सुरुवात करतात. कारण रात्री पायी चालत जाण्याने थकवा कमी जाणवत असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. हा रस्ता डोंगराच्या अगदी डोकावरून जातो. त्यामुळे भाविक यात्रा पूर्ण करत जेव्हा मंदिर परिसरात पोहचतात तेव्हा सूर्याचे अद्भूत दर्शन घडते.

ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सुविधा

माता वैष्णोदेवीच्या यात्रेला येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी काही खास सुविधा सुरु करण्यात आल्या आहेत. ज्यात ज्येष्ठ नागरिकांना गाढव किंवा खेचर प्राण्यांची सवारी करण्याचा पर्याय आहे. या सवारीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना दिवसा बॅटरीवर चालणाऱ्या ऑटो रिक्षाची सेवाही उपलब्ध आहे.

- Advertisement -

‘या’ आहेत सुविधा

माता वैष्णोदेवीच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांना खाण्यापिण्याची चिंता करण्याची काहीचं गरज नाही, यात्रेच्या मार्गावर भाविकांना जेवणाची तसेच पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. तर भाविकांना थोडावेळ आराम करण्यासाठी मुख्य परिसरात एक भवन आहे. याठिकाणी मोफत किंवा पैसे भरून राहण्याची सुविधा देण्यात आली आहे. याठिकाणी शाकाहारी भोजनालय, आरोग्य सेवा, झोपण्याची सेवा, क्वॉल रुमची सेवा उपलब्ध आहे. तसेच देवीचा प्रसाद आणि फोटो, चिन्ह विकणारी दुकानं देखील आहेत.

दर्शनसाठी येणाऱ्या भाविकांना ‘या’ कागदपत्रांची गरज

माता वैष्णोदेवीच्या यात्रेला येणाऱ्या भाविकांना सोबत ओळखपत्र बाळगणे आवश्यक आहे. यात पासपोर्ट, ड्रायव्हिंग लाईन्स, वोटर आयडी कार्ड आणि पॅनकार्डसोबत बाळगणे गरजेचे आहे. या कागदपत्रांशिवाय रजिस्ट्रेशन होऊ शकत नाही. भाविकांना ऑनलाईन दर्शन स्लिप मात वैष्णोदेवी संस्थानच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार आहे. या वेबसाईटवरूनचं भाविक रजिस्ट्रेशन करु शकतात. यानंतर एक आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल. हा पासवर्ड आणि आयडी वेबसाईटवर टाकून तुम्ही दर्शनासाठी स्लिप मिळवू शकता. मात्र आज नववर्षानिमित्त भाविकांच्या अचानक झालेल्या गर्दीमुळे एकच गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. (NEW YEAR 2022)


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -