दिल्लीच्या नायब राज्यपालपदी विनय कुमार सक्सेना

दिल्लीचे नवे नायब राज्यपाल म्हणून विनय कुमार सक्सेना (Vinay Kumar Saxena) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपूर्वी अनिल बैजल (Anil Baijal) यांनी दिल्लीच्या नायब राज्यपाल (Deputy Governor) पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आता दिल्लीच्या नव्या नायब राज्यपालपदी विनय कुमार सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत विनय कुमार सक्सेना?

सध्या विनय कुमार सक्सेना हे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे (KVIC) अध्यक्ष आहेत. २३ मार्च १९५८ रोजी त्यांचा जन्म झाला. सक्सेना हे कानपूर विद्यापीठाचे विद्यार्थी होते. त्यांनी कॉर्पोरेट तसेच एनजीओ क्षेत्रात काम केले आहे.

अनिल बैजल यांनी १८ मे रोजी दिल्लीच्या नायब राज्यपाल पदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त होतं. तसेच त्यांनी राजीनामा देण्यामागे काय कारण आहे यावर देखील चर्चेला उधाण आलं होतं. परंतु अनिल बैजल यांनी वैयक्तिक कारण देत राजीनामा दिला होता. अनिल बैजल यांना दिल्लीचे नायब राज्यपाल म्हणून डिसेंबर २०१६ मध्ये नियुक्त करण्यात आले होते.

हेही वाचा : श्रीलंकेला भारताकडून 40000 मेट्रिक टन पेट्रोलची मदत

शेतकरी आंदोलनाशी संबंधित प्रकरणांमध्ये वकिली करण्यासाठी दिल्लीच्या मंत्रिमंडळाने वकिलांची यादी मंजूर केली होती. परंतु मंजूर केलेल्या वकिलांची यादी अनिल बैजल यांनी नाकारली होती. तेव्हा केजरीवाल सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात मतभेद देखील झाल्याचे सांगितले जात आहे.

बैजल यांची कारकीर्द पाहिली असता बैजल हे १९६९ बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी दिल्ली डेव्हलपमेंट ऑथोरिटीमध्ये उपाध्यक्ष म्हणूनही काम केले होते. केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असताना त्यांची केंद्रीय गृह सचिवपदी निवड करण्यात आली होती.


हेही वाचा : Kedarnath Yatra 2022: मुसळधार पावसामुळे केदारनाथ यात्रा स्थगित, भारतीय हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी