घरक्रीडाIPL 2023 CSK vs GT : आयपीएलचा अंतिम सामना पावसाने धुतला; मोदी...

IPL 2023 CSK vs GT : आयपीएलचा अंतिम सामना पावसाने धुतला; मोदी स्टेडियममधून प्रेक्षक परतले

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) अंतिम समाना आज नरेंद्र मोदी स्टेडियम होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट कायम आहे. नुकताच अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे.

इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2023) अंतिम समाना आज नरेंद्र मोदी स्टेडियम होणार आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे सावट कायम आहे. नुकताच अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नाणेफेकीला उशीर होत आहे. परिणामी सामना सुरू होण्यासही उशीर होणार आहे. मात्र पाऊस पडत असल्याने क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

आयपीएलचा अंतिम सामना कर्णधार महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्ज आणि कर्णधार हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. मात्र पावसामुळे सामन्याला उशीरा सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण आज जर पाऊस थांबलाच नाही, तर आयपीएलकडून काही नियम तयार करण्यात आलेले आहे. आज जर कमीत कमी पाच षटकारांचा सामना झाला नाही. तर रिझर्व डेला सामना होणार आहे.

- Advertisement -

रिझर्व डे सोमवारी ठेवण्यात आला आहे. आजही एकही चेंडू पडला नाही, तर फायनलचा थरार उद्या पाहायला मिळणार आहे. पण सोमवारीही पाऊस पडला तर विजेता कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. जर सोमवारी पावसामुळे सामना झाला नाही. गुजरातला विजेता घोषित करण्यात येणार आहे. कारण, साखळी फेरीत गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे.

पावसामुळे सामना रद्द झाल्यास पुढे काय?

- Advertisement -

पावसामुळे सामन्यात विलंब झाल्यास आवश्यक 20 षटकांपैकी काही षटकांची संख्या कमी केली जाण्याचीही शक्यता आहे. त्यानुसार, प्रत्येक संघाला किमान पाच षटके फलंदाजी करण्याची संधी मिळेल. आजच्या सामन्यासाठीची शेवटची वेळ रात्री 12.26 वाजता असेल, त्यानंतरही सामना न झाल्यास हा सामना सोमवारी खेळवण्यात येईल. सोमवारीही पावसाने ख्वाडा घातल्यास गुजरातचा संघ विजेता होईल.


हेही वाचा – IPL 2023 FINAl : पावसाचा धोका टळला; गुजरातवर दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकण्याचा दबाव

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -