Airtel पाठोपाठ Vodafone Idea चा रिचार्जही २५ टक्क्यांनी महागला, वाचा नवे दर

Airtel vs Jio vs Vodafone Idea:A look at popular plans after price hike
Airtel पाठोपाठच वोडाफोनचा रिजार्जही २५ टक्क्यांनी महागला, वाचा नवे दर

Airtel पाठोपाठ आता Vodafone Idea (VI) कंपनीचा रिचार्ज प्लॉन देखील महागला आहे. VI ने नुकतीच नवी रिचार्ज प्लॅन्सची लिस्ट जारी केली आहे. Vodafone-Idea (Vi) ने २३ नोव्हेंबर २०२१ ला आपल्या नव्या रिचार्ज प्लॅन्सची घोषणा केली आहे. हे नवे रिचार्ज प्लॅन्स २५ नोव्हेंबरपासून देशभरात लागू होतील. यामुळे Vodafone-Idea चा ७९ रुपयांचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आता ९९ रुपये झाला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना टॉकटाईम आणि 200 GB डेटा मिळतो. तर VI चा १४९ रुपयांचा प्लॅन आता १७९ रुपये झाला आहे. या प्लॅनची वैध्यता २८ दिवस असून यात अनलिमिटेड कॉलिंगसह 300 SMS आणि 2 GB डेटा दिला जातो.

१४९ रुपयांचा प्लॅन आता १७९ रुपयांना

Vodafone Idea चा १४९ रुपयांचा प्लॅन आता १७९ रुपये झाला आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची असून यात ग्राहकांना 2 GB डेटा आणि 300 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाईल.

२१९ चा प्लॅन आता २६९

Vodafone Idea ने आता २१९ रुपयांच्या प्लॅनची किंमत २६९ रुपयांपर्यंत वाढवली आहे. या प्लॅनमध्ये दररोज १०० SMS सह 1 GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगची सोय आहे. त्याची वैधता २८ दिवस आहे. एअरटेलच्या या रेंजच्या प्लानची किंमत २६५ रुपये आहे.

२४९ चा प्लॅन आता २९९ रुपये

vi चा २४९ रुपयांचा प्लॅन आत्ता २९९ रुपयांवर गेला आहे. या प्लॅनची ​​वैधता देखील २८ दिवसांची आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 100 SMS आणि 1.5 GB डेटा दररोज मिळेल.

vodafone idea recharge plan price hike know all plan detail here
Airtel पाठोपाठच वोडाफोनचा रिजार्जही २५ टक्क्यांनी महागला, वाचा नवे दर

२९९ रुपयांचा प्लॅन आता ३५९ रुपयांना

Vi ग्राहकांना आता २९९ रुपयांच्या प्लॅनसाठी आत्ता ३५९ रुपये द्यावे लागतील. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज 2 GB डेटा आणि 100 SMS मिळतील. त्याची वैधता २८ दिवस आहे.

३९९ चा प्लॅन आता ४७९ रुपये

Vodafone Idea चा ३९९ रुपयांचा प्लान जो ५६ दिवसांच्या वैधतेसह येतो, तो आता ४७९ रुपयांचा झाला आहे. यामध्ये ग्राहकांना दररोज 1.5 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० SMS मिळतील.

४४९ रुपयांचा प्लॅन आता ५३९ रुपयांना

या वाढीव किंमतींमुळे ५६ दिवसांच्या वैधतेसह येणार ४४९ रुपयांचा प्लॅन आता ५३९ रुपये झाला आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS सुविधेसह दररोज 2 GB डेटा आहे.

३७९ रुपयांचा प्लॅन आता ४५९ रुपयांना

कंपनीचा ३७९ रुपयांचा प्लॅन, जो ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो, तो आता ४५९ रुपये झाला आहे. यात एकूण 6 GB डेटा, दररोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे.

५९९ रुपयांचा प्लॅन आता ७१९ रुपयांना

वोडाफोनचा ५९९ रुपयांचा प्रीपेड प्लान आता ७१९ रुपये झाला आहे. यामध्ये दररोज 1.5 GB डेटा, दररोज 100 SMS आणि ८४ दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे.

६९९ रुपयांचा प्लॅन आता ८३९ रुपयांना

Vodafone Idea चा ६९९ रुपयांचा प्रीपेड प्लान आता ८३९ रुपये झाला आहे. ८४ दिवसांच्या वैधतेसह, यात दररोज 2 GB डेटा, दररोज 100 SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे.

याशिवाय १४९९, आणि २३९९ रुपयांच्या प्लॅनमध्येही मोठी वाढ झाली आहे.