Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी West Bengal Assembly Election 2021: 'मेलो तरी चालेल, पण जल्लोष झालाच पाहिजे';...

West Bengal Assembly Election 2021: ‘मेलो तरी चालेल, पण जल्लोष झालाच पाहिजे’; TMC कार्यकर्ते सुसाट

पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे नियम पायदळी तुडवत टीएमसी कार्यकर्त्यांचा एकच जल्लोष.

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगाल (West Bengal Assembly Election 2021), पुदुच्चेरी, तामिळनाडू, केरळ आणि आसाम येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांचे आज निकाल जाहीर होत आहेत. मात्र, हे निकाल जाहीर होण्यापूर्वीच निवडणूक आयोगाने कोरोनासंदर्भात नियम पाळण्याचा राज्यांना इशारा दिला होता. पण, निकालाच्या दिवशी कोरोनाचे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. ‘मेलो तरी चालेल, पण जल्लोष झालाच पाहिजे’ अशा प्रतिक्रिया टीएमसी कार्यकर्ते देत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाला हे कार्यकर्ते निमंत्रण देत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या काँग्रेस पक्षाला दोनशेहून अधिक जागांवर आघाडी मिळाली आहे. ममता बॅनर्जी यांनी भाजपला धूळ चारल्यानंतर टीएमसी कार्यकर्त्यांनी एकच धुडगूस घातला. फटाके आणि गुलालची उधळण करत ढोल वाजवत त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी या कार्यकर्त्यांनी कोरोनाचे नियम पायदळी तुडवत एकच जल्लोष केल्याचे पाहायला मिळाले. तर सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडाला. एका कार्यकर्त्यांनी तर हातात ममता दींदीचे फलक घेऊन गुलालची उधळण करत ठेका धरल्याचे दृश्य दिसून येत आहे. तर यातील काही कार्यकर्त्यांनी तोडांला मास्क देखील लावलेले नाही. त्यामुळे या कार्यकर्त्यांना कोरोनाचा विसर पडल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

- Advertisement -

अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा इशारा

दरम्यान, निवडणूक आयोगाने यात हस्तक्षेप करत सदर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना उद्देशून एक पत्र काढले आहे. या पत्रात त्यांनी विजयी उमेदवारांसाठी सुरु असणारा जल्लोष तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच सदर घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या एसएचओ आणि इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा इशाराही निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे. तसेच परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याबद्दल त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही केली जाऊ शकते, असेही त्यात पत्रात म्हटले आहे.

- Advertisement -


हेही वाचा – Bengal Assembly Election 2021 : नंदीग्रामच्या निकालाकडे देशाचं लक्ष का? काय आहेत तिथली राजकीय गणितं?


 

- Advertisement -