Thursday, May 6, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी West Bengal Assembly Election 2021 Result Live Updates : ममता बॅनर्जींचा विजय;...

West Bengal Assembly Election 2021 Result Live Updates : ममता बॅनर्जींचा विजय; सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव

Related Story

- Advertisement -
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर नंदीग्राम मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये पिछाडीवर असल्याने ममता बॅनर्जींचा पराभव होण्याची शंका निर्माण झाली होती. पण नंतर ममता बॅनर्जी यांनी जोरदार मुसंडी मारली आणि भाजपाचे सुवेंदू अधिकारी यांचा १२०० मतांनी पराभव केला.

पश्चिम बंगाल विधानसभेच्या मतमोजणीचा निकाल जसजसा पुढे सरकताना दिसत आहे तसतसे भाजपचे ग्रह फिरताना दिसत आहेत. कारण काहीवेळापूर्वीच नंदीग्राम मतदारसंघात पिछाडीवर असलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर सुवेंदू अधिकारी यांना मागे टाकलं आहे. आता सुवेंदू अधिकारी १५०० मतांनी पिछाडीवर पडले आहेत. तर दुसरीकडे राज्यभरात तृणमूल काँग्रेसची जोरदार घौडदौड सुरु आहे. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा २०० जागा जिंकत असल्याचे संकेत मिळत आहेत. तर २०० जागा मिळवण्याच्या वल्गना करणाऱ्या भाजपची शंभरीतच दमछाक होताना दिसत आहे.


पश्चिम बंगालमधील सर्व २९२ जागांचे सुरुवातीचे कल हाती आले आहेत. यानुसार तृणमूल काँग्रेस मोठी आघाडी घेण्याची शक्यता असून स्पष्ट बहुमत मिळत असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. तृणमूल काँग्रेसने १९४ जागांवर आघाडी घेतली असून भाजपा मात्र १०० च्या आतच रोखली जाण्याची शक्यता आहे. भाजप ९३ जागांवर आघाडीवर आहे.


- Advertisement -

नंदीग्राममध्ये ममत बॅनर्जी या तब्बल ७ हजार २८७ मतांनी पिछाडीवर आहेत. सुवेंदू अधिकारी यांची दुसऱ्या फेरीतनंतर जोरदार मुसंडी.


नंदीग्राममध्ये काँटे की टक्कर 

- Advertisement -

नंदीग्राममध्ये आघाडीवर असलेल्या ममता बॅनर्जी या पुन्हा एकदा पिछाडीवर गेल्या आहेत. भाजपचे सुवेंदू अधिकारी पुन्हा एकदा आघाडीवर आहेत.


नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींची मुसंडी, सुवेंदू अधिकारी पिछाडीवर

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींची मुसंडी मारली असून त्या आघाडीवर गेल्या आहेत. भाजपचे सुवेंदू अधिकारी पिछाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलानुसार नंदीग्राममधूम ममता बॅनर्जी या पिछाडीवर होत्या आणि सुवेंदू अधिकारी आघाडीवर होते. आता मात्र, ममदा बॅनर्जी यांनी मुसंडी मारली आहे.

- Advertisement -