घरताज्या घडामोडीWest Bengal Elections: राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने फटकारले, रात्री ७ ते सकाळी...

West Bengal Elections: राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने फटकारले, रात्री ७ ते सकाळी १० दरम्यान प्रचाराला घातली बंदी

Subscribe

रॅली,जाहीर सभा,पथनाट्य,नुक्कड सभा करण्यावरही बंदी

पश्चिम बंगालसह (West Bengal Elections) पाच राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे केंद्र सरकारने कोरोनाला रोखण्यासाठी काही नियम लागू केले आहेत. परंतू या नियमांना केराची टोपली दाखवल्याचे चित्र निवडणूक असलेल्या राज्यांत पाहायला मिळत आहे. निवडणूक आयोगाने घातलेल्या नियमांचेही निवडणूकीमध्ये पालन होत नसल्याचे दिसत आहे. देशात कोरोना परिस्थिती चिंताजनक झाली असली तरी निवडणूक असलेल्या राज्यात नागरिकांची आणि स्टार प्रचारक, उमेदवार राजकीय पक्ष एकत्र येऊन गर्दी करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देशातील नागरिकांनी टीका केली होती. याची दखल निवडणूक आयोगाने घेत आज निवडणूक घेण्यात आलेल्या राज्यातील राजकीय पक्षांची बैठक बोलावली होती. या बैठकीत निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना चांगलेच फटकारले आहे. तसेच रात्री ७ ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० पर्यंत राजकीय पक्षांना प्रसार करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाने घेतलेल्या बैठकीत राजकीय पक्षांना खडेबोल सुनावले आहे. बैठकीनंतर निवडणूक आयोगाने एक पत्रक जाहीर केले आहे. पश्चिम बंगालमध्ये १६ एप्रिलपासून म्हणजे आजपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. पश्चिम बंगालमध्ये ८ टप्प्यात निवडणूक घेण्यात येत आहे. यातील पाच टप्प्याची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये सोशल डिस्टंन्सिंग, मास्क वापरण्याच्या नियमांना पायदळी तुडवल्यामुळे रात्री ७ ते सकाळी १० या कालावधीत प्रचार करण्यास बंदी असणार आहे. या वेळात कोणत्याही प्रकारच्या रॅली,जाहीर सभा,पथनाट्य,नुक्कड सभा करण्यावरही बंदी असणार आहे. तसेच सहाव्या ते आठव्या टप्प्यातील निवडणूकांपूर्वी शांतता काळ ७२ तासाचा असणार आहे. यामुळे आता मतदानच्या ७२ तासापूर्वी सभा,मेळावे आणि रॅलीला बंदी असणार आहे. तसेच प्रचारासाठी बंदी घालण्यात आले आहे.

- Advertisement -

दरम्यान आढावा बैठकीत निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना चांगलेच फटकारले आहे. प्रचारसभा आणि जाहीर प्रचारादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे मास्क वापरण्याच्या नियमांचे पालन झाले नसल्याचे मत निवडणूक आयोगाने नोंदवले आहेत. तर प्रचार आणि रॅलीदरम्यानही राजकीय पक्षांनी नियमांचे उल्लंघन केले असल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे नव्याने घातलेल्या निर्बंधांमुळे कोरोना नियमांचे पालन होईल असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -