घरCORONA UPDATEकॅन्सर रुग्णांनी कोरोना लस घेण्याआधी काय करावे आणि काय करु नये? जाणून...

कॅन्सर रुग्णांनी कोरोना लस घेण्याआधी काय करावे आणि काय करु नये? जाणून घ्या

Subscribe

लसीकरण करुन शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा एकमेव उद्देश

देशात जानेवारीपासून लसीकरण सुरु करण्यात आले. सध्या तिसऱ्या टप्प्यात लसीकरण केले जात आहे. लस घेतलेल्या बऱ्याच जणांना अनेक दुष्परिणाम दिसून आले आहेत. देशात कोरोना व्यक्तिरिक्त इतर आजारांनी रुग्ण ग्रस्त आहेत. त्यातील कँन्सर हा महत्त्वाचा आजार आहे. कँन्सर रुग्णांना कोरोना लस द्यायची का? कँन्सर असलेल्या रुग्णांना किंवा जे कँन्सरमधून बाहेर आले आहेत त्यांना लस देणे सुरक्षित आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कँन्सर रुग्णांनी कोरोना लस घेण्याआधी काय करावे आणि काय नाही? जाणून घ्या. अनेक वैद्यकीय तज्ज्ञांनी अशी शिफास केली आहे की, कँन्सरग्रस्त रुग्णांनी किंवा ज्यांना कँन्सर होऊन गेला आहे अशा रुग्णांना कोरोना प्रतिबंधात्मक लस द्यावी. कारण शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा एकमेव उद्देश लसीकरणामागे आहे. त्याचप्रमाणे वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, कँन्सर रुग्णांचा विचार केला असता त्यात सध्या कँन्सरवर उपचार घेणारे आणि कँन्सरमधून बरे झालेले असे दोन गट आहेत. त्यातील कँन्सरमधून बरे झालेल्या रुग्णांना लस द्यावी अशी शिफारस तज्ज्ञांकडून करण्यात आली आहे.

कँन्सर रुग्णांवर कोणतीही शस्रक्रिया झाली असेल तर त्यांनी कोरोना लसीकरण करण्याआधी डॉक्टरांचा योग्य सल्ला घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुमच्यावर कोणत्या प्रकारच्या कँन्सरवर उपचार सुरु आहेत, त्याचे फायदे, औषधांचे साइड इफेक्ट काय आहेत हे सर्व कोरोना लसीचा पहिला डोस घेण्याआधी माहिती करुन घेणे आवश्यक आहे. त्याचबरोबर किमोथेरपी किंवा रेडीएशन सारखे उपचार घेत असलेल्या रुग्णांनी त्याच्या शेवटच्या थेरपीनंतर ५ ते ७ दिवसांचे अंतर ठेवून लस घेतली पाहिजे असे तज्ज्ञ सांगतात. त्याचबरोबर लसीकरण करण्याआधी रक्ताची cbc टेस्ट करणेही आवश्यक आहे.

- Advertisement -

ज्या रुग्णांची ब्रेस्ट कँन्सरवर शस्रक्रिया झाली आहे अशा रुग्णांच्या डाव्या खांद्यावर लस देण्यात येते. परंतु ज्यांचे डावे ब्रेस्ट काढले असतील तर उजव्या खांद्यावर किंवा दोन्ही ब्रेस्ट काढले असतील तर मांडीवर किंवा पार्श्वभागावर लस घेतली पाहिजे असे तज्ज्ञ सांगतात. त्याचप्रमाणे ल्युकेमेनिया सारखी थेरपी घेत असलेल्या रुग्णांचे कोरोना लसीकरण थोडे उशिरा झाल्यास हरकत नाही. यासंबंधी डॉक्टरांशी बोलणे अत्यंत गरजेचे आहे. स्टेम सेल थेरपी घेत असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसर लसीकरण करावे. त्याचबरोबर ज्यांनी बी सेल्सची कमतरता आहे अशा रुग्णांचे लसीकरण उशिरा करावे की नाही डॉक्टरांसी बोलून किंवा प्रदात्याशी चर्चा करुन ठरवता येईल,असे तज्ज्ञ सांगतात.


हेही वाचा – Pulse किंवा Oximeter शिवाय कशी मोजाल ऑक्सिजन लेव्हल ? वाचा सोपा पर्याय

- Advertisement -

 

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -