घरताज्या घडामोडीHappy hypoxia covid: कोरोना रुग्ण हॅप्पी हायपोक्सिया जीवघेण्या आजाराचे होतायत शिकार? जाणून...

Happy hypoxia covid: कोरोना रुग्ण हॅप्पी हायपोक्सिया जीवघेण्या आजाराचे होतायत शिकार? जाणून घ्या लक्षणे

Subscribe

कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून रुग्णांमध्ये अनेक नवनवीन आजार होताना दिसत आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे फुफ्फुसावर परिणाम होत असल्याचे ऐकले आहे, पण प्रत्यक्षात हा विषाणू संपूर्ण शरीराला पोकळ बनवत आहे. या विषाणूमुळे काहींच्या शरीरात रक्त्याच्या गुठळ्या तयार होऊ लागल्या आहेत तर काहीजण मधुमेहाचे शिकार होत आहेत. तसेच काहींमध्ये काळी बुरशीजन्य संसर्गाचे लक्षणे दिसू लागली आहेत आणि काहीजण सुगंध आणि चव गमावून बसले आहेत. आता या कोरोना महामारीचे अजून एक लक्षणं समोर आले आहे, ज्याचे नाव ‘हॅप्पी हायपोक्सिया’ आहे.

या आजाराच्या नावाच्या पहिल्यांदा हॅपी (आनंदी) असे असेल तरी कोणत्याही व्यक्तीचा हा आजार प्राण घेऊ शकतो. दुसऱ्या लाटेमध्ये बाधित तरुणांमध्ये कोरोना धोकादायक होण्याचे कारण हॅप्पी हायपोक्सिया आहे. याला सायलेंट किलर देखील म्हटले आहे. पण हॅप्पी हायपोक्सिया नक्की काय आहे? याची लक्षणे काय आहेत? सायलेंट किलर याला का म्हटले जात? हे जाणून घेऊयात.

- Advertisement -

सायलेंट किलर काय म्हटले जाते?

कोरोनाच्या धोकादायक स्टेजपैकी एक हॅप्पी हायपोक्सिया आजार आहे. या आजारामुळे कोरोना रुग्णाला हृदयविकारासारखा झटका येतो आणि रुग्णाला मृत्यूच्या जाळ्यात ढकलले जाते. महत्त्वाचे म्हणजे कोरोना रुग्णांला माहित देखील पटत नाही, तो या आजाराचा केव्हा शिकार झाला आहे. सुरुवातीला रुग्णांमध्ये कोणतीच लक्षणे दिसत नाही. यामुळे हॅप्पी हायपोक्सियाला सायलेंट किलर म्हटले जात आहे.

तरुणांना हॅप्पी हायपोक्सिया का कळतं नाही?

जेव्हा रुग्ण हॅप्पी हायपोक्सिया शिकार होतो, तेव्हा त्याच्या रक्तात ऑक्सिजन पातळी मोठ्या प्रमाणात कमी होते. यावेळेस रुग्णांमध्ये ऑक्सिजन पातळी ३० ते ५० टक्क्यांपर्यंत किंवा यापेक्षा जास्त कमी होते, परंतु रुग्णाला हे कळतं नाही.

- Advertisement -

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तरुणांची रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली असते. अशा परिस्थितीत त्याच्यात ऑक्सिजन सॅच्युरेशन लेव्हल कमी होते तेव्हा काहीच समजत नाही की, ते सायलेंट किलर हायपोक्सियाचे शिकार झाले आहेत. कारण कोरोना रुग्ण असूनही त्यांना सुरुवातीला कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत किंवा सौम्य लक्षणे असतात. ते एकदम हॅप्पी दिसतात परंतु अचानक त्यांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होऊ लागते, जे पुढे जीवघेणे ठरू शकते.

हॅप्पी हायपोक्सिया होण्यामागचे कारण

तज्ज्ञांच्या मते, हॅप्पी हायपोक्सियाचे प्रमुख कारण म्हणजे फुफ्फुसात रक्त जमणे. यामुळे फुफ्फुसांना पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही, ज्यामुळे रक्तातील ऑक्सिजन सॅच्युरेशनचे प्रमाण कमी होते. हायपोक्सियामुळे हृदय, मेंदू, किडनी यांसारखे शरीरातील मुख्य अवयव काम बंद करू शकतात.

हॅप्पी हायपोक्सियाची लक्षणे

ओठांचा रंग बदलणे. लाल असेल तर निळे पडणे.

त्वचेचा रंग लाल किंवा पर्पल दिसणे.

घामाचा रंग बदलणे.

ऑक्सिजन पातळी कमी होणे.

श्वास घेण्यास त्रास होणे.

मेंदूत ऑक्सिजनची कमी झाल्यामुळे पेशी खराब होणे आणि चिडचिड होणे.

हॅप्पी हायपोक्सियाची लक्षणे अशा प्रकारची असल्यामुळे सातत्याने लक्षणांवर लक्ष्य दिले पाहिजे आणि आवश्यक असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. कारण यांसारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर जीवघेणा धोका पत्करावा लागेल.


हेही वाचा – 2DG औषध कोरोनावर कसे करते मात? काय आहे किंमत आणि साईड इफेक्ट? जाणून घ्या सविस्तर


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -