घरताज्या घडामोडीभारतात 26 लाख व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण...

भारतात 26 लाख व्हॉट्सअॅप अकाऊंट बंद, जाणून घ्या काय आहे हे प्रकरण ?

Subscribe

मेटाचा मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपकडून नवीन आयटी नियमाबद्दल माहिती देण्यात आली आहे. आयटी नियम, 2021 अंतर्गत सप्टेंबर महिन्यात भारतातील 26 लाखांहून अधिक खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिक जबाबदाऱ्या वाढण्यासाठी या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.

मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर देशात सुमारे 500 कोटी वापरकर्ते आहेत. सप्टेंबरमध्ये भारताला 666 तक्रार अहवाल प्राप्त झाले आहेत. आयटी नियम 2021 नुसार, कंपनीने सप्टेंबर 2022 महिन्याचा अहवाल जारी केला आहे. यामध्ये वापरकर्ता-सुरक्षा अहवालात प्राप्त झालेल्या तक्रारींचा तपशील आणि व्हॉट्सअॅपद्वारे केलेल्या संबंधित कृती तसेच व्हॉट्सअॅपच्या स्वतःच्या प्रतिबंधात्मक कृतींचा समावेश आहे.

- Advertisement -

ऑगस्ट महिन्यात 23 लाख खाती होती बंद

ऑगस्टमध्ये भारतातील 23 लाखांहून अधिक तक्रारी खात्यांवर बंदी घालण्यात आली होती. अॅडव्हान्स आयटी नियम 2021 अंतर्गत, पाच कोटीहून अधिक वापरकर्ते असलेल्या प्रमुख डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने महिन्याचा अहवाल प्रकाशित करणं आवश्यक आहे.

- Advertisement -

खुल्या, सुरक्षित, विश्वासार्ह आणि इंटरनेटच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने नागरिकांच्या सुरक्षेबाबतच्या उद्देशाने काही सुधारणा करण्यात आल्या आहेत.


हेही वाचा : अब्जावधी वर्षांपूर्वी मंगळावर होता विशाल महासागर; शास्त्रज्ञांच्या हाती लागले पुरावे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -