घरदेश-विदेशलोकसभा निवडणुकीकरता 'व्हॉट्सॲप'ची नवी सुविधा

लोकसभा निवडणुकीकरता ‘व्हॉट्सॲप’ची नवी सुविधा

Subscribe

देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअॅपने 'फेक न्यूज'ला आळा घालण्यासाठी 'टिपलाइन' ही नवीन सुविधा आणली आहे. यामुळे फेक न्यूजला आळा बसण्यासाठी मोठी मदत होणार आहे.

सोशल मीडियावर सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या चॅटिंग ॲपमध्ये व्हॉट्सअॅप हे युजर्सच्या अधिक पसंतीचे आहे. या व्हॉट्सअॅपचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र सोशल मीडियाचा वाढता वापरामुळे अनेक फायदे असले तरी तोटेही तितकेच आहेत. नाण्यांच्या दोन बाजू असतात याच प्रमाणे सोशल मीडियाच्याही दोन बाजू आहे. अनेकदा सोशल मीडियाचा वापर खोट्या बातम्या (फेक न्यूज) पसवण्यासाठी केला जातो. दरम्यान, देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘फेक न्यूज’ला आळा घालण्यासाठी ‘व्हॉट्सअॅप’ने माहितीची विश्वासार्हता तपासण्यासाठी ‘टिपलाइन’ ही सुविधा सादर केली आहे. त्यातून अफवांना आळा बसणार असून ‘व्हॉट्सॲप’ यूजरला माहितीची सत्यता पडताळण्यासाठी ही टीपलाइन उपयोगाची ठरणार आहे. त्याद्वारे माहितीची खातरजमा करणे शक्य होणार आहे.

या कंपनीने तयार केली टिपलाइन

‘पीआरओटीओ’ या भारतीय मीडिया स्किलिंग स्टार्टअप कंपनीने ही टिपलाइन तयार केली आहे. त्यातून अफवांचा डेटाबेस तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे चुकीच्या माहितीचा अभ्यास करणे शक्य होणार आहे, असे ‘व्हॉट्‌सअॅप’ने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -

वाचा – ‘फिंगरप्रिंट लॉक’मुळे व्हॉट्सअॅप चॅट राहणार सुरक्षित


अशी वापरता येईल ‘टिपलाइन’ सुविधा

एखाद्या व्यक्तीला चुकीची माहिती किंवा अफवा असल्याचे कळल्यास त्या व्यक्तीने ‘चेकपॉइंट टिपलाइन’ला व्हॉट्‌सअॅपवर ९६४३०००८८८ या क्रमांकावर पाठवता येणार आहे. तसेच व्हॉट्सअॅप यूजरने संशयित संदेशाची माहिती ‘टिपलाइन’सोबत शेअर केल्यावर ‘पीआरओटीओ’चे पडताळणी केंद्र त्यावर प्रतिक्रिया मागवेल. तसेच संबंधित माहितीबद्दलचा दावा पडळण्यात आला किंवा नाही याची माहिती संबंधित यूजरला कळवली जाईल.

- Advertisement -

अशी कळवली जाईल प्रतिक्रिया

आपण पाठवलेली माहिती खरी आहे, खोटी आहे, दिशाभूल करणारी आहे, वादग्रस्त आहे किंवा संदर्भहीन आहे, अशा स्वरुपात ही प्रतिक्रिया कळवली जाणार आहे. याशिवाय उपलब्ध असणारी इतर माहितीही दिली जाईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. छायाचित्रे, व्हिडिओ लिंक किंवा मजकूर या स्वरूपातील माहितीचा आढावा या केंद्रात घेतला जाणर आहे. तसेच इंग्रजीसह हिंदी, तेलगू, बंगाली आणि मल्याळम या भाषांतील माहिती देखील पडताळली जाणार आहे.


वाचा – ‘व्हॉट्सअॅप’ सुरक्षित ठेवण्यासाठी या खास टीप्स


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -