घरटेक-वेकअँड्रॉइड मोबाइलनंतर व्हॉट्सअॅप वेबवरही आता 'पिक्चर-इन-पिक्चर'

अँड्रॉइड मोबाइलनंतर व्हॉट्सअॅप वेबवरही आता ‘पिक्चर-इन-पिक्चर’

Subscribe

व्हॉट्सअॅपने आता एक नवीन फीचर आणल आहे. अँड्रॉइड मोबाइलनंतर आता व्हॉट्सअॅप वेबवरही 'पिक्चर-इन-पिक्चर' हे फीचर युजर्सच्या भेटीस आणले आहे. या फीचरमुळे व्हॉट्सअॅप वेबवरही युजर्सला व्हिडिओ पाहता चॅट देखील करता येणार आहे.

जगभरातील लोकांच्या सर्वाधिक पसंती पडणारे सोशल मीडिया अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. हे व्हॉट्सअॅप लोकांना अधिक सुविधा देण्यासाठी आणि युजर फ्रेंडली होण्यासाठी नेहमी नवनवे अपडेट्स घेऊन येतं असतं. काही दिवसांपुर्वीचे व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर आणल होतं. त्यामध्ये ग्रुपमध्ये अॅड करण्यापूर्वी परवानगी घेणे बंधनकारक होते आणि आता पुन्हा एकदा नवीन फीचर आणलं आहे. आता व्हॉट्सअॅपनं ‘पिक्चर-इन-पिक्चर’ (PIP) हे फीचर व्हॉट्सअॅप वेबवरही उपलब्ध करुन दिलं आहे. या फीचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप युजर्स चॅट विंडोमध्येच व्हिडिओही प्ले करु शकतात. म्हणजेच, व्हॉट्सअॅपवर एखाद्याशी बोलत असताना तुम्हाला बोलत असताना तुम्हाला व्हिडिओही पाहायचा असल्यास तुम्हाला चॅट विंडोमधून बाहेर येण्याची आवश्यकता नाही.

हे फीचर या व्हर्जनवर रिलीज करण्यात आलं

WAetaInfo च्या अहवालानुसार, हे फीचर व्हॉट्सअॅप वेब व्हर्जन ०.३.२०४१ रिलीज करण्यात आलं आहे. पूर्वी हे फीचर फक्त व्हॉट्सअॅपवर शेअर करण्यात येणाऱ्या व्हिडिओसाठीच काम करत होतं. पण आता यात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यू – ट्यूब व्हिडिओलाही सपोर्ट करणारा पर्याय देण्यात आला आहे. आतापर्यंत व्हॉट्सअॅप वेबवर येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी एक मोठी विंडो ओपन होत होती, ज्या व्हिडिओ प्ले होत होता. मात्र आता हे फीचर आल्यानंतर व्हॉट्सअॅपवर येणारा प्रत्येक व्हिडिओ हा वेगवेगळ्या बॉक्समध्ये ओपन होणार असून हा व्हिडिओ पाहताना तुम्ही चॅटिंग देखील करु शकता.

- Advertisement -

काय आहे हे नवीन फीचर्स

व्हॉट्सअॅपवर आपल्याला विविध व्हिडीओच्या लिंक येत असतात. मात्र त्या लिंक पाहण्यासाठी आपल्याला दुसऱ्या ब्राऊजरवर जावं लागत. मात्र आता व्हॉट्सअॅपने आता यावर एक तोडगा काढला होता. आता नव्या अपडेटनुसार व्हॉट्सअॅप वेबवरही हे फीचर आले असून व्हॉट्सअॅप वेबकरता चॅट करताना व्हिडीओ पाहता येणार आहे. या नवीन व्हॉट्सअॅप अपडेटनुसार व्हिडीओ लिंक पाहण्यासाठी बाहेर यावे लागणार नाही. आपण ती व्हिडीओ त्या व्हॉट्सअॅपवर चालू असताना पाहू शकतो तसेच त्याचदरम्यान व्हॉट्सअॅपवरील एसएमएस देखील पाहता येऊ शकतात. गेल्या काही दिवसांपूर्वी याची चाचणी करण्यात आली होती. ती आता सर्वांसाठी उपलब्ध होत आहे. याला Picture – in Picture (PIP) (पिक्चर इन पिक्चर) मोड असं म्हटलं जातं आहे.


वाचा – व्हॉट्सअॅपने आणले व्हिडीओचे भन्नाट फिचर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -