घरCORONA UPDATELockDown: रेल्वे गाड्या ४ मे रोजी सुरू होणार?; उद्या होणाऱ्या बैठकीत निर्णय

LockDown: रेल्वे गाड्या ४ मे रोजी सुरू होणार?; उद्या होणाऱ्या बैठकीत निर्णय

Subscribe

लॉकडाऊनच्या काळात रेल्वे सेवाही ठप्प झाली असून ही सेवा पुन्हा कधीपासून सुरू करायची यावर केंद्रात एख महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. रेल्वे मंत्रालय आणि भारत सरकार याबाबत उद्या, २९ एप्रिल रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेणार असल्याते न्यूज १८ या वृत्त संस्थेच्या माध्यमातून सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनती परिस्थिती पाहता ही बैठक खुपच महत्त्वाची मानली जात आहे. ३ मे पर्यंत लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू असून त्यानंतर म्हणजेच ४ मे रोजी रेल्वे गाड्या धावणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तेव्हा या बैठकीत रेल्वेसंबंधीचे चित्र स्पष्ट होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून रेल्वे गाड्या बंद ठेवण्यात आल्या होत्या. पहिल्या टप्प्यात लॉकडाऊननंतर म्हणजेच १४ एप्रिलनंतर रेल्वेची आगाऊ तिकीट विक्री सुरू करण्यात आली होती. मात्र नंतर ती रद्द करून कोणतीही तिकीट विक्री रेल्वेने केलेली नाही.

हे मुद्दे येतील चर्चेत 

देशात सध्या दररोज १ हजार ५०० नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांचा आकडा ३० हजारांवर पोहोचला आहे. अशा स्थितीत ३ मेनंतर देखील रेल्वे गाड्या सुरू होण्याची शक्यता कमीच आहे. काही राज्यांनी त्यांचे कामगार, मजूर इतर राज्यांमध्ये अडकले असून त्यानंतर परत आणण्यासाठी रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. तसेच ज्यावेळी रेल्वे गाड्या सुरू करण्यात येतील तेव्हा त्यात एटी कोच नसावेत, जेणेकरून कोरोना संसर्गाची शक्यता राहणार नाही, असाही सल्ला रेल्वेला दिला जात आहे. देशात रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन अशा जिल्ह्यांची विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे रेल्वे गाड्या रेड झोनमध्ये चालवल्या जाऊन नयेत, असे मत व्यक्त होत आहे. तसेच ज्या ज्या स्थानकातून प्रवासी रेल्वेत दाखल होतील, त्यांची पूर्ण स्क्रिनिंग केली जावी, जेणेकरून कोरोना संसर्गाची भीती राहणार नाही.

- Advertisement -

हेही वाचा –

रानडुक्करांच्या हल्ल्यात एक ठार; दोन जखमी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -