घरताज्या घडामोडीOmicron Symptoms: लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनची दिसतात 'ही' लक्षणे

Omicron Symptoms: लहान मुलांमध्ये ओमिक्रॉनची दिसतात ‘ही’ लक्षणे

Subscribe

ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. सध्या प्रौढांना जेवढी ओमिक्रॉनची लागण होत आहे, तेवढी मुलांना होत नाही, असे डॉक्टरांनी मत व्यक्त केले.

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटनंतर आता ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका देशभरात वाढला आहे. देशात आतापर्यंत २ हजार १३५ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. कोरोनाच्या वेगवेगळ्या रुपानंतर ओमिक्रॉमनने पालकांची चिंता वाढवली आहे. कारण लहान मुलांनाही ओमिक्रॉनची लागण होत आहे. यामुळे काही देशांमध्ये लहान मुलांना लस देत आहे. देशात नुकतेच १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. दरम्यान आता ओमिक्रॉनची लक्षणे जरी सौम्य दिसत असली तरी सर्वांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

दिल्लीचे डॉ. विकास मौर्य म्हणाले की, आजकाल आपल्याला कोरोना पॉझिटिव्ह लोकांमध्ये ताप, घशात खवखव आणि खोकल्यासारखी लक्षणे दिसतात. तरुण आणि मुलांमध्ये कोरोनाची लागण होणे सातत्याने वाढत आहे. परंतु यामध्ये जास्ती करून मुलांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. मुलांमध्ये ताप, खोकला, घशात खवखव, घशात वेदना यासारखी लक्षणे जास्त करून दिसत आहेत. दरम्यान मुलांमध्ये संक्रमण होण्याचा धोका सातत्याने वाढताना दिसत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

- Advertisement -

लहान मुलांमध्ये कोणती लक्षणे दिसतात?

मुंबईचे डॉ. हरीश चाफले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओमिक्रॉन आणि डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहेत. सध्या प्रौढांना जेवढी ओमिक्रॉनची लागण होत आहे, तेवढी मुलांना होत नाही आहे. परंतु मुलांना अजूनही धोका आहे.

मुलांमध्ये ओमिक्रॉनची जी लक्षणे दिसत आहे, ते मुख्यतः शरीरात श्वास घेणाऱ्या मार्गाशी संबंधित आहेत. जसे की नाक गळणे, घशात वेदना, शरीर दुखणे, कोरडा खोकला आणि ताप येणे अशी ओमिक्रॉनची लक्षणे मुलांमध्ये दिसत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Symptom: सावधान! त्वचेवर दिसणारी ‘ही’ लक्षणे असू शकतात ओमिक्रॉनची


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -