घरदेश-विदेशकोरोनामुळे UPSC NDA 2021 परीक्षा होणार रद्द?

कोरोनामुळे UPSC NDA 2021 परीक्षा होणार रद्द?

Subscribe

परंतु अद्याप केंद्रीय लोकसेवा आयोगाने परीक्षा रद्द करण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला नाही.

देशात वाढत्या कोरोना संक्रमणामुळे अनेक राज्यांमध्ये बोर्ड परीक्षा आणि प्रवेश परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज २ लाखाहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. अशा परिस्थित संसर्गाचा धोका लक्षात घेता यूपीएससी एनडीए परीक्षा २०२१ स्थगित करण्याची मागणी केली जात आहे.

UPSC NDA 2021 ही परीक्षा १८ एप्रिल २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. परंतु देशात वाढत्या कोरोना संक्रमणामुळे अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेली परीक्षा पुढे ढकल्याची मागणी यूपीएससी देणारे विद्यार्थी करत आहेत. ज्याप्रमाणे NEET PG 2021 परीक्षा स्थगित करण्यात आली त्याचप्रमाणे UPSC NDA 2021 परीक्षाही पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. त्यामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाने या मागणीची दखल घेत लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी होतेय.

- Advertisement -

देशात सध्या कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊनचे नियम करत निर्बंध लादले आहेत. यामुळे परीक्षा केंद्रांवर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांनी अडचणीचा सामना करावा लागणार आहे. तसेच UPSC NDA 2021 या परीक्षेसह कोणत्याही परीक्षांना वेळेवर उपस्थित राहणे अधिक अवघड होणार आहे. परंतु अद्याप केंद्रीय लोकसेवा आयोगाने परीक्षा रद्द करण्यासंदर्भात निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे UPSC NDA 2021 परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. दरम्यान UPSC NDA 2021 विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी कॅडिडेट्स अॅटमिशन कार्ड डाऊनलोड करण्यासाठी upsc.gov.in साईटचा उपयोग करु शकता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -