नवलच! मागच्या जन्मी होते कोंबडी, महिलेचा अजब दावा

कोंबडी

एका महिलेने दावा केला आहे की ती मागच्या जन्मी कोंबडी होती. एवढच नाही तर या महिलेने आपल्या घराच्या अंगणात कोंबडी सारखं चालायलाही सुरूवात केली. बेल्जियम मध्ये राहणाऱ्या या महिलेला आपण कोंबडी असल्याचा दावा केला आहे. या महिलेला तिच्या घरच्यांनी उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आहे. डॉक्टरांनी केलेल्या दाव्यानुसार ही महिला गंभीर मानसिक आजारांचा सामना करत आहे. त्यामुळे तिच्या मेंदूवर तीचा ताबा राहिला नाहीये.

५४ वर्षीय ही विवाहीत महिला फार्मसीमध्ये नोकरी करते. कुंटुंबातील एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्या महिलेची अशी अवस्था झाली. या महिलेने कधीच मद्यपान आणि नशेचे औषधही कधी घेतले नव्हते. असं तिच्या वैद्यकीय तपासणीत सिद्ध झालं आहे.

या महिलेला तिच्या घराच्या बाहेर असणाऱ्या गार्डनमध्ये कोंबडीप्रमाणे चालताना आणि ओरडताना अनेकांनी बघितलं. त्यानंतर घरच्यांनी तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या महिलेने डॉक्टरांना सांगितलं की बागेत गेल्यावर मला मी कोंबडी असल्यासारखं वाटायला लागतं.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार माणसात दिसणारी ही लक्षणं काही तास किंवा काही दिवसही दिसू शकतात. अशा प्रकारचा आजार खूप कमी माणसांमध्ये बघायला मिळतो. हा एक मानसिक आजार आहे.


हे ही वाचा – Sushant Singh Suicide Case मुंबई पोलिसांकडेच; पार्थ पवारांच्या मागणीला गृहमंत्र्यांचा नकार