घरदेश-विदेशजिच्यासाठी केले लिंग बदल, तिनेच फिरवली पाठ

जिच्यासाठी केले लिंग बदल, तिनेच फिरवली पाठ

Subscribe

हरियाणात पत्नी साठी लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया करणाऱ्या पतीकडेच पत्नीने पाठ फिरवली आहे. घरच्यांच्या दबावामुळे पत्नी ने हा निर्णय घेतल्याचा आरोप पतीने केला आहे.

प्रेम अंधळं असतं मात्र लग्न हे डोळे उघडतात असे अनेकदा बोलल्या जाते. हरियाणामध्येही असाच प्रकार घडला आहे. आपल प्रेम मिळवण्यासाठी लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करूनही पत्नीने पतीकडे पाठ फिवरली असल्याची घटना हरियाणात समोर आली आहे. फिर्याद दिलेला पती हा त्यामुलीवर शाळेत असल्यापासून प्रेम करत होता. मात्र दोन्ही मुली असल्यामुळे एकाने लिंग परिवर्तन करण्याची मागणी घरच्यांनी केली होती. यामुळे या मुलीने लिंग बदल शस्त्रक्रिया केली होती. मात्र लग्ना नंतर काही दिवसातच त्याच्या पत्नीने त्याला सोडले. सध्या हा पती मानसिक तणावात असून त्याने पत्नीला मिळवण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पत्नीची समजूत काढली मात्र पती बरोबर राहायचे नसल्याचे तिने सांगितली आहे. प्रेमाची ही अजब गजब कहानी पहिल्यांदाच हरियाणा येथे घडली आहे.

काय आहे प्रकरण 

शाळेत असलेल्या दोन लहान मुलींमध्ये प्रेमसंबध होते. मात्र वय लहान असल्यामुळे ते लग्न करु शकत नव्हते. २१ वर्षाच्या झाल्यावर या दोघींनी लग्न करण्याचे ठरवले होते. मात्र भारतात समलिंगी विवाहास परवनगी नसल्याने त्यांच्या घरच्यांनी अडवले. प्रेयसीशी लग्न करण्यासाठी एका मुलीने काही महिन्यापूर्वी लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया केल्यानंतर या दोघांनी मागीलवर्षी ऑक्टोबर महिन्यात लग्न केले होते. मात्र लग्नानंतर या दोघांच्या प्रेमसंबधामध्ये कटूता निर्माण झाली. यानंतर पत्नी घर सोडून माहेरी राहायला आली. मागील काही दिवसांपासून ती आपल्या माहेरीच राहत आहे.

- Advertisement -

“या दोघींना जर लग्न करायचे असेल तर एकीने लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करणे आवश्यक असल्याची अट घरच्यांनी टाकली होती. मागील वर्षी यापैकी एका मुलीने लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेला १० लाख रुपये खर्च आला होता” – मुलीच्या कुटुंबातील सदस्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -