घरदेश-विदेशजगातील सर्वात उंच युद्धभूमीवर महिला अधिकारी तैनात; 'हे' कठीण प्रशिक्षण केले पूर्ण

जगातील सर्वात उंच युद्धभूमीवर महिला अधिकारी तैनात; ‘हे’ कठीण प्रशिक्षण केले पूर्ण

Subscribe

भारतीय संरक्षण दलातील अनेक विभागात आता महिलांना पुरुषांप्रमाणे संधी दिली जात आहे. मात्र जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या भारतातील सियाचीनमध्ये यापूर्वी केवळ पुरुष अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावण्याची संधी दिली जात होती. पण आता महिला अधिकारी अधिकारी देखील या युद्धभूमीत सेवा बजावू शकणार आहेत. भारतीय सैन्याच्या फायर अॅण्ड फुरी कॉर्प्सच्या महिला अधिकारी कॅप्टन शिवा चौहान यांना सियाचीनच्या या युद्धभूमीत कर्तव्य बजावण्याची संधी दिली आहे. कॅप्टन शिवा सियाचिनमध्ये 15,632 फूट उंचीवर कुमार पोस्टवर तैनात आहेत. या ठिकाणी दिवसा तापमान उणे 21 आणि रात्री उणे 31 अंश सेल्सिअस आहे. यावरून या युद्घभूमीत काय आव्हानांचा सामना करावा लागतो याची केवळ कल्पना करु शकतो. यावरून आपल्या मातृभूमीच्या संरक्षणासाठी, प्रेमासाठी एक महिला देखील पुरुषांच्याबरोबरीने काम करु शकते याचं नवं उदाहरण शिवा चौहान यांच्या निमित्ताने समोर आलं आहे. कारण भारतीय सैन्याच्या इतिहासात प्रथमचं एखाद्या महिलेला या धोकादायक पोस्टवर तैनात केले आहे.

फायर अँड फुरी कॉर्प्सला 14 वा कॉर्प्स म्हटले जाते. नौदलाच्या 300 अग्निवीर सैनिकांत 341 महिला आहेत. दरम्यान शिवा चौहान यांच्या नियुक्तीनंतर फायर अॅण्ड फुरी कॉर्प्सने ट्विट करत लिहिले की, कॅप्टन शिवा चौहान या पोस्टवर तैनात होणाऱ्या पहिला भारतीय महिला आहेत. हे जगातील सर्वात उंच युद्धक्षेत्र आहेत. शिवा यांनी या ठिकाणी तैनात होण्यापूर्वी अतिशय कठीण प्रशिक्षण पूर्ण केले आहेत. यात बर्फाची भिंत ओलांडणे, हिमस्खलन आणि हिमस्खलन मदत अभियान सरावाचा समावेश आहे.

- Advertisement -

रात्री 32 उणे तापमान

फायर अॅण्ड फुरी कॉर्प्सचे मुख्यालय लेहमध्ये असून ते सैन्याच्या उत्तरी कमांड अंतर्गत येते. या अंतर्गत होणाऱ्या नियुक्ती चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर होते. यातील भारतीय सैन्य सियाचिन ग्लेशियरचे संरक्षण करतात. सध्या सियाचिनमध्ये दिवसाचे तापमान उणे 21 अंश सेल्सिअस आहे. तर रात्रीचे तापमान उणे 32 अंश सेल्सिअस आहे. कुमार पोस्टवर नेहमीच 3000 सैनिकांची उपस्थिती असते. आता सैन्यात याठिकाणी महिलांची महिला जवान आणि हवाई दलात एअर वुमन म्हणून नियुक्ती होईल, अशी माहिती चीफ अॅडमिरल हरी कुमार यांनी दिली आहे.


संपावरील वीज कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाईचा बडगा, राज्य सरकारची नोटीस

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -