घरदेश-विदेशपेमेंट टाळण्यासाठी महिलेने केला जीवे मारण्याचा प्रयत्न

पेमेंट टाळण्यासाठी महिलेने केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Subscribe

मधूमती साहा या महिलेने पेमेंट टाळण्यासाठी दोन सेल्समॅन्सला वीष पाजून जीवेमारण्याचा प्रयत्न केला. ३८ हजारांसाठी जीव घेण्याचा प्रयत्न.

पेमेंट टाळण्यासाठी अनेक ग्राहक देयकरांचे फोन उचलायचे टाळतात किंवा फोन बंद ठेवतात. मात्र कोलकाता येथील एका महिलेने ३८ हजारांचे पेमेंट टाळण्यासाठी चक्क सेल्समेन्सला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. मधूमती साहा असे या महिलेचे नाव असून ती कोलकाता येथे न्यू अलीपुर परिसरात राहते. काम झाल्यानंतर पैसे घेण्यासाठी आलेल्या सेल्समॅन्सला कोल्ड ड्रिंकमध्ये विष टाकून त्यांना जीवेमारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी यामहिले विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चेक बाऊन्स झाल्यानंतर पैसे मागयला गेलेल्या सेल्ममेन्सला मारण्याचा प्रयत्न या महिलेनी केला. मानसिक तणावामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

कोलकाता पोलिसांनी मधूमतीला भारतीय दंड संहितेच्या कलम ३२८ अन्वये अटक केले आहे. आरोपी महिलेवर जीवे मारण्याच्या उद्देशाने औषध किंवा विषाचा वापर केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्यात दहा वर्ष तुरुंगवास ठेठावण्यात येतो किंवा दंड भरून शिक्षा कमीही करता येत असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे.

- Advertisement -

सोमनाथ मंडल आणि अमित चक्रवर्ती असे या सेल्समॅन्सची नावे आहेत. घटने नंतर या दोघांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांना ३ दिवस देखरेखी खाली ठेवण्यात येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सोमनाथ मंडल याने दिलेल्या माहितीनुसार चेक बाऊन्स झाल्यानंतर तो आणि त्याचा सहकारी पैसे घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी या महिलेनी त्यांना मिठाई आणि कोल्ड ड्रिंग्स पिण्यासाठी दिले. सोमनाथने मिठाई खाल्ली मात्र ड्रिंक जास्त पिले नाही. ड्रिंक पिल्यानंतर त्याचा सहकारी बेशुद्ध झाल्यानंतर सोमनाथने कंपनीला फोन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मधूमतीने त्याच्या हाथून फोन हिसाकून घेतला तसेच सोमनाथच्या अंगावर कुत्रा सोडला. मात्र आरडा ओरडा केल्यामुळे या ठिकाणी असलेल्या लोकांनी या दोघांना वाचवले.

- Advertisement -

महिलेनी कंपनीकडून स्वयंपाक घराचे काम करुन घेतले. या कामानंतर महिलेनी ३७ हजार ९८० रुपयांचा चेक कंपनीला दिला. मात्र चेक बाऊन्स झाल्यानंतर कॅश देण्यासाठी ही महिला तयार झाली. या दोघांना पैसे गोळा करण्यासाठी पाठवले.- कंपनीचे अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -