‘भारताचा तालिबान होऊ देणार नाही’ ममता बॅनर्जींचा मोदींवर हल्लाबोल

mamta-banerjee.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर येथील रॅलीदरम्यान भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. जनतेला संबोधित करताना त्यांना ताबिलानचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही जहरी टीका केली आहे. ‘नरेंद्र मोदी जी, अमित शहा जी, आम्ही भारताचा तालिबान होऊ देणार नाही.’ अशी टीका करत त्यांना मोदी सरकारला टार्गेट केले. यावेळी बोलताना ममता म्हणाल्या की, “भारत एकजुटेच राहील. गांधीजी, नेताजी, विवेकानंद, सरदार वल्लभभाई पटेल, गुरुनानक जी, गौतम बुद्ध, जैन सर्व या देशात एकत्र राहणार आहोत. आम्ही कोणालाही भारताचे विभाजन करु देणार नाही.”

“भाजप एक ‘खोटारडा”

ममता पुढे म्हणाल्या, “भाजप एक ‘खोटारडा’ पक्ष आहे. ते खोटे बोलतात की, आम्ही राज्यात दुर्गापूजा, लक्ष्मी पूजनाला परवानगी दिली नाही. पण जर भाजपचे लोक कलम १४४ लावत राहिले तर दुर्गा पूजा कशी होईल? बंगालच्या भवानीपूर मतदारसंघात 30 सप्टेंबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. भवानीपूरमधून ममता बॅनर्जी  पोटनिवडणूक लढवत आहे. या पोटनिवडणूकीत तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांना भाजपाच्या प्रियंका टिबरेवाल टक्कर देणार आहेत. यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक जिंकणे अत्यंत महत्त्वाची आहे. कारण यावरूनच त्यांचे मुख्यमंत्री म्हणून पुढील भवितव्य  निश्चित होणार आहे. या पोटनिवडणुकीचा निकाल ३ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल.

“…आणि झोळी उचलून निघाले अमेरिका”

अशातच ममता बॅनर्जी यांनी मोदींच्य़ा अमेरिका दौऱ्यावरही सडकून टीका केली आहे. देशातील परिस्थिती सुधारात येत नाही आणि झोळी उचलून निघाले अमेरिका… देशातील परिस्थिती सुधारा साहेब अशा शब्दात त्यांनी मोदींवर टीका केली आहे.


PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी अमेरिकेतील ज्वाइंट बेस एंड्रयूजमध्ये दाखल, भारतीयांकडून जंगी स्वागत