घरताज्या घडामोडीपत्रकार परिषदेमध्ये नवजोत सिद्धूने दिली शिवी; अडकले वादाच्या भोवऱ्यात

पत्रकार परिषदेमध्ये नवजोत सिद्धूने दिली शिवी; अडकले वादाच्या भोवऱ्यात

Subscribe

नवजोत सिंह सिद्धू पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. पंजाब काँग्रेस भवनमध्ये नवजोत सिंह सिद्धू एक पत्रकार परिषद घेत होते, ज्यामध्ये ते चरणजीत सिंह चन्नींच्या सरकारच्या योजनांच्याबाबत सांगत होते. तसेच या परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तर देत होते. जेव्हा त्यांना राज्य सरकारकडून वितरित करण्यात येत असलेल्या लेब कार्डबाबत प्रश्न विचारला, तेव्हा ते चन्नी सरकारच्या या योजनेबद्दल बोलू लागले आणि बोलता-बोलता त्यांनी शिवी दिली.

नवजोत सिंह सिद्धू म्हणाले की, ‘आमची ही योजना नाही, हे मी सांगतोय. आमची तर अर्बन गारंटी आहे. जी कोणी आजपर्यंत दिली नाही….@#$@@@.’

- Advertisement -

पुढे पत्रकार परिषदेत नवजोत सिद्धू म्हणाले की, ‘शहरात राहणाऱ्या मजूरांकडे नोकरी नाही आहे. पंजाबमध्ये शहरी बेरोजगारी गावांपेक्षा अधिक आहे. गावांच्या तुलनेत शहरी बेरोजगारी दुप्पट आहे. पंजाब मॉडेल शहरी रोजगाराचे आश्वासन देते, लोकांना नोकरीची हमी देते. एवढेच नाही तर अकुशल लोकांनाही नोकरीची हमी देते. पंजाबमध्ये मजूरांचे १ टक्के रजिस्ट्रेशन पण नाही आहे. जर सरकारला माहितच नसेल कोणाला गरज आहे? गरीब कोण आहे? तर ते फायदा कोणाला देईल आणि कसे देईल. आजपर्यंत कोणता सर्व्हे केला नाही. तर कसे समजले गरीब कोण आहे?’

- Advertisement -

‘गॅस सिलेंडरची किंमत दुप्पट वाढली आहे. पेट्रोल-डिझेलची किंमत दुप्पट आहे, घरातील खाण्याचे तेलाच्या किंमती दुप्पट, डाळींच्या किंमती दीडपट आहे. जेव्हा या किंमती दुप्पट होतात, तेव्हा मोठ्या लोकांना याचा काही फरक पडत नाही. परंतु जेव्हा कोणी २५०-३०० रुपये कमाई करणारा मजूर टोमॅटो-कांदा घ्यायला जातो, तर त्याच्याकडील २५०-३०० मधील १०० राहतील. जे एकच काम करतात, त्यांची रोजची मजुरी एकच असावी. त्यांची मजुरी सरकार निश्चित करेल. जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपला पगार कापला जात नाही, परंतु या मजूरांचा पगार कापला जातो,’ असे नवजोत सिद्धू म्हणाले.


हेही वाचा – आगामी यूपी विधानसभा निवडणुकीत ३००हून अधिक जागा जिंकू, अमित शहांचा दावा


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -