घरताज्या घडामोडीG7 : जगभरात साडेतीन कोटी लोक करताहेत तीव्र उपासमारीचा सामना

G7 : जगभरात साडेतीन कोटी लोक करताहेत तीव्र उपासमारीचा सामना

Subscribe

जगभरातील प्रभावशाली अशा नेत्यांनी नुकत्याच जी ७ परिषदेत एक गोष्ट सामुहिकपणे मान्य केली, ती म्हणजे अनेक राष्ट्रांना भेडसावणाऱ्या दुष्काळी परिस्थितीची. जगातील अनेक देशांमध्ये जवळपास ३४ दशलक्ष इतक्या मोठ्या प्रमाणात लोक हे दुष्काळाचा सामना करत आहेत. दुष्काळासारख्या समस्येवर मात करण्यासाठीच आता दुष्काळाला कसा आळा घालता येईल, यासाठीचे प्रयत्न करण्यासाठी या परिषदेच्या निमित्ताने एकमत झाले आहे. जगभरात दुष्काळाचा सामना करणाऱ्या या व्यक्तींचे आणि त्यांच्या राहणीमानात आपण नक्कीच अमुलाग्र बदल करू शकतो असा विश्वास जगभरातील मोठ्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्याचवेळी या दुष्काळी परिस्थितीशी सामना करण्यासाठी निधीचे संकलन आणि अशा व्यक्तींपर्यंतची पोहच यासारख्या गोष्टींसाठीचे सहकार्य अपेक्षित असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

जी ७ बैठकीत जगभराती नेत्यांनी या दुष्काळासारख्या समस्येवर मात करण्यासाठी ७ अब्ज डॉलर्सचे आर्थिक सहकार्य करण्यासाठी तयारी दर्शवली. जगभरातील अनेक देशांमध्ये असलेल्या दुष्काळासारख्या परिस्थितीकडे मानवी दृष्टीकोनातून पाहण्याची गरज असून या पुढाकारातून नक्कीच अनेक जीव वाचवता येतील अशी अपेक्षाही या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली. याआधीच WFP, FAO मार्फत ५.५ अब्ज डॉलर्सच्या मदतीचे आवाहन करण्यात आले होते. पण निधीच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी दुष्काळाची परिस्थिती हाताळताना मर्यादा आल्या. येमेन, दक्षिण सुदान, बुर्किना फासो, मदगस्कर, एथिओपिआ यासारख्या देशात दुष्काळाची समस्या ही भीषण आहे. आगामी सहा महिन्यांच्या कालावधीसाठी वर्ल्ड फुड प्रोग्रामला ४.५ अब्ज डॉलर्स इतक्या रकमेची आवश्यकता आहे. पण कमी प्रमाणात मिळालेल्या निधीमुळे जाणारे मानवी जीव आणि दीर्घकालीन उदिष्टांनाही मोठा फटका बसत आहे. निधीच्या कमतरतेमुळेच उपासमारीची वेळ आलेल्या लोकांसाठी अन्न उपलब्ध करून देणे हे सध्या वर्ल्ड फुड प्रोग्रामचे उदिष्ट आहे. दक्षिण सुदान आणि येमेनसारख्या भागात अनेक लोक दुष्काळी परिस्थितीत जगत आहेत. तसेच अनेक लोकांना वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात धान्याच्या कपातीचा सामना करावा लागला आहे. तर काही राष्ट्रात निधीअभावी अवघी ५० टक्के इतकीच मदत करता येणे शक्य आहे. तर काही ठिकाणी अन्न पुरवठ्यासाठी आपत्कालीन स्वरूपाची अशी परिस्थिती आहे.

- Advertisement -

अफगाणीस्तान येथेही खूपच असुरक्षितता असून अनेक देशांमध्ये मदत पोहचवण्याच्या अडचणी आहेत. त्यामध्ये नायजेरिया, इथोपिया, कॉंगो, साऊथ सुदान यासारख्या देशात अनेक ठिकाणी मदत पोहचवण्यात अनेक अडचणी आल्या आहेत. टिगरे येथे जवळपास साडेतीन लाख लोकांना तीव्र उपासमार सहन करावी लागत आहे. पण याठिकाणी सैन्य तैनात असल्याने मदत पोहचवण्यात अनेक अडथळे येत आहेत. त्यामुळे अशा भागामध्ये मदत पोहचवण्यासाठी प्रवेश खुला होणे गरजेचे आहे. त्यामुळे जीव वाचवतानाच अन्नाअभावी जाणारे बळीही कमी करण्यासाठी मदत होऊ शकते अशा वर्ल्ड फुड प्रोग्रासमोरील अडचणी आहेत.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -