‘हा’ ठरला जगातला महागडा घटस्फोट!

अॅमझॉन कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी बेझोस यांचा अखेर घटस्फोट झाला. पोटगी म्हणून तब्बल ३८.३ अब्ज डॉलर पत्नीला दिले.

अॅमेझॉनचे कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी बेझोस

जगातल्या सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीचे म्हणजेच अॅमेझॉनचे कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस आणि त्यांची पत्नी मॅकेन्झी बेझोस यांचा अखेर एकमताने घटस्फोट झाला आहे. शुक्रवारी सिएटल येथील न्यायालयात या घटस्फोटला मंजूरी मिळाली. जेफ बेझोस यांनी पोटगी म्हणून ३८.३ अब्ज डॉलरची (सुमारे २५ लाख कोटी रुपये) संपत्ती पत्नी मॅकेन्झी बेझोसला दिली जाणार आहे. जगातील हा सर्वात महागडा घटफोस्ट ठरला आहे.

गेली २५ वर्षे पती-पत्नी असलेल्या जेफ आणि मॅकेन्झी या दापत्याने विभक्त होण्याच्या निर्णयाबाबत जानेवारी महिन्यातच त्यांनी टि्वटवर जाहीर केलं होतं. मुलांच्या पालकत्वासंबंधी या दोघांनी स्वतंत्र समझोत केला आहे. एवढी संपत्ती पत्नीला देऊन सुध्दा जेफ बेझोस अजूनही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या स्थानावर टिकून आहे. तसेच मॅकेन्झी या घटस्फोटानंतर जगातील तिसरी सर्वात श्रीमंत महिला ठरणार आहे.

बेझोस दापत्याकडे अॅमेझॉन कंपनीचे एकूण १६ टक्के भागभांडवल संयुक्तपणे होते. त्यापैकी चार टक्के भागभांडवल हे घटस्फोटानंतर मॅकेन्झी यांच्या मालकीची होईल. उरलेले जेफ यांच्याकडे अॅमझॉनचे १२ टक्के भागभांडवल कायम राहणार आहे. त्याचे सध्याचे मूल्य ११४.८ अब्ज डॉलर एवढे असेल. अॅमझॉन कंपनीच्या सभांमधील मतदानाचे हक्क मात्र मॅकेन्झी यांनी जेफ यांच्या हाती दिले आहे.

घटस्फोटात मिळालेल्या पोटगीतून निम्मी संपन्नी दान 

सन २०१० मध्ये जगभरातील गर्भश्रीमंतांनी आपली संपत्ती दान करण्याचे आवाहन करणारा खुला वचननामा अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफेट आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी जारी केले होते. मॅकेन्झी बेझोस त्यावेळी या वचननाम्यावर स्वाक्षरी केली होती. त्यामुळे मॅकेन्झी या घटस्फोटात मिळालेल्या ३८ अब्ज डॉलर पोटगी पैकी निम्म्या संपत्तीचे दानधर्म करणार आहे.