घरटेक-वेकभारतात Yahoo ची न्यूज वेबसाईट झाली बंद; जाणून घ्या कारण

भारतात Yahoo ची न्यूज वेबसाईट झाली बंद; जाणून घ्या कारण

Subscribe

Yahoo ने भारतातील आपली न्यूज वेबसाइट बंद केली असल्याचे समोर आले आहे. भारतात याहू न्यूज वेबसाइट बंद होण्यामागील कारण म्हणजे नवीन परकीय थेट गुंतवणूक (FDI) धोरण असल्याचे सांगितले जात आहे. यासंदर्भातील याहू वेबसाइटने आपल्या युजर्सना एक अधिसूचना देखील दिली आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की २६ ऑगस्ट २०२१ पासून याहू इंडिया यापुढे कोणतंही कन्टेंट प्रकाशित करणार नाही. असे असले तरी याहू अकाऊंट, मेल आणि सर्च एक्सपिरीअन्सवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे.

म्हणून घेतला याहूने निर्णय

याहू न्यूज वेबसाईट बंद केल्याने याहू क्रिकेट, फाइलेन्स एंटरटेनमेंट आणि मेकर्स इंडियावर यांच्यावर देखील परिणाम होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकन टेक आणि टेलिकॉम कंपनी वेरिझॉनने २०१७ मध्ये याहूची मालकी घेतली होती. कंपनीने वेबसाईटद्वारे युजर्सचे आभार मानले असून असे म्हटले की २० वर्षांचा प्रवास उत्तम आहे. एफडीआयचे नवीन नियम ऑक्टोबरपासून लागू होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे याहूने सांगितले.

- Advertisement -

भारतातील बातम्यांचा विभाग होणार बंद

दरम्यान, परदेशी निधीला २६ टक्के पेक्षा जास्त डिजिटल न्यूज मीडिया आउटलेटवर मर्यादित ठेवण्यात आल्याने व्हेरिझॉन कंपनीने भारतातील बातम्यांचा विभाग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नवीन आयटी नियम याहू न्यूज वेबसाईटवरही लागू होतात, ज्याअंतर्गत कंपनीला खूप कमी वेळेत एक संपूर्ण टीम तयार करावी लागणार आहे. तसेच दर महिन्याला सरकारला अहवाल द्यावा देखील सादर करावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे.


खूषखबर! आशा सेविकांच्या मोबदल्यात वाढ; राज्य मंत्रिमंडळाचे ६ महत्त्वाचे निर्णय

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -