घरदेश-विदेशयोगी सरकारच्या कायदा व्यवस्थेचा फोलपणा; एन्काऊंटर प्रकरणी सपा आणि एमआयएमची टीका

योगी सरकारच्या कायदा व्यवस्थेचा फोलपणा; एन्काऊंटर प्रकरणी सपा आणि एमआयएमची टीका

Subscribe

नवी दिल्ली : उमेश पाल हत्याप्रकरणी उत्तर प्रदेशमध्ये दोन दिवसांपूर्वी अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम या दोन्ही आरोपींना पोलीसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले. त्यानंतर या प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांचीही हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वैद्यकीय तपासणीसाठी कोल्विन रुग्णालयात नेत असताना मीडिया कर्मचाऱ्यांनी पोलिसांना घेरले होते. यावेळी दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्यामुळे या हत्येचा लाईव्ह व्हिडिओ रेकॉर्ड झाला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत, मात्र समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि एमआयएमचे नेते असुदुद्दीन औवेसी यांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

असद अहमदची एन्काऊंटरची ज्यादिवशी घडली तेव्हा माफिया अतिक अहमदला प्रयागराज कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकताच अतिकलला कोर्टातच रडू कोसळले. विशेष म्हणजे मुलाच्या दफनविधीसाठी त्याला परवानगी देण्यात आली नव्हती. शनिवारी (15 एप्रिल) अतिक आणि अश्रफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी कोल्विन रुग्णालयात नेत असताना पोलिसांच्या ताफ्यावर अचानक गोळीबार झाला. संपूर्ण मीडिया तेथे उपस्थित असल्यामुळे हा हल्ला कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या दोघांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर अतिक अहमद ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडमध्ये या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियातून व्हायरल झाला आहे. या हल्यात अतिक आणि अशरफचा मृत्यू झाला असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. लोकांकडून या हत्येचे समर्थन होत असताना दुसरीकडे माक्ष समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसी यांनी या घटनेवर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

- Advertisement -

गुन्हेगारीने सीमा ओलांडली
उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारीने सीमा ओलांडली असून आरोपींना आता कशाचीच भिती नाही आहे. पोलिसांच्या ताफ्यामध्ये घुसून जर कोणाची हत्या करण्यात येत असेल तर सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेचे काय?, असा प्रश्न अखिलेश यादव यांनी विचारला आहे. या घटनेनंतर जनतेच्या मनात भीतीचे वातावरण पसरले असून काही लोकं जाणीवपूर्वक असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अखिलेख यादव केला आहे.

योगी सरकारच्या कायदा व्यवस्थेचा नाकामीपणा
अतिक अहमद आणि त्याचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात होते. या दोघांच्या हातात बेड्या होत्या. मात्र या दोघांची हत्या करण्यात आली आणि यावेळी जय श्रीरामचे नारे देण्यात आले. त्यामुळे या दोघांची हत्या योगी सरकारच्या कायदा व्यवस्थेचा फोलपणा आहे आणि या हत्येचा उत्साह करणारेही या हत्येस जबाबदार आहेत, असे म्हणत एमआयएम प्रमुख असदुद्दीन औवेसी संताप व्यक्त करत योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

असद आणि गुलामचा शनिवारी दफनविधी
दरम्यान, शनिवारी (15 एप्रिल) असद आणि गुलाम यांच्यावर ए-खाक ची रस्म पूर्ण करण्यात आली. यावेळी पोलिसांकडून ड्रोनने निगराणी राखण्यात आली होती. सकाळी ९.३० वाजता असद यांचा पार्थिव प्रयागराजमधील कसारी-मसारी कब्रस्तानमध्ये नेण्यात आला, तर गुलामवर मेहदौरी कब्रस्तान येथे दफविधी करण्यात आला. यावेळी जवळच्या २५ नातेवाईकांना कब्रस्तानमध्ये प्रवेश देण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -