घरसंपादकीयअग्रलेखदिवाळीत सुवर्ण झुंबड!

दिवाळीत सुवर्ण झुंबड!

Subscribe

दिवाळी आली की सोने खरेदीला झुंबड उडते. विशेषत: गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते. मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होतानाच गेल्या काही दिवसात सोन्या-चांदीच्या भावातही घसरण होताना दिसली; मात्र आता ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या भावात या आठवड्याच्या सुरवातीपासूनच तेजी दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला आहे.

दिवाळी आली की सोने खरेदीला झुंबड उडते. विशेषत: गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते. मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होतानाच गेल्या काही दिवसात सोन्या-चांदीच्या भावातही घसरण होताना दिसली; मात्र आता ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या भावात या आठवड्याच्या सुरवातीपासूनच तेजी दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्यात घसरण झाली तर चांदीमध्ये किंचित वाढ झाली आहे. हाच ट्रेण्ड भारतीय बाजारपेठेत गेल्या आठवड्यापासून दिसून आला. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत गुरुवारी ४६ हजार ४२० रुपये असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४६ हजार ४६० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६ हजार ४२० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५० हजार ६४० प्रति १० ग्रॅम आहे. तर, नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६ हजार ४५० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५० हजार ६७० रुपये आहे. खरे तर, यंदाची दिवाळी कोरोना काळानंतर येत असल्यामुळे धनत्रयोदशीला सोन्याची अधिक खरेदी होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेमुळे अनेकांनी आपले विवाह पुढे ढकलले आहेत. लांबणीवर टाकलेले विवाह यावर्षी होणार असून त्याचा मोठा फायदा दागिने उद्योगाला होणार आहे. त्याचप्रमाणे गेल्या दोन वर्षांत सराफांच्या दालनात जाऊन प्रत्यक्ष सोनेखरेदी करता न आल्यामुळे यावर्षी ग्राहक मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करतील, अशी अपेक्षा आहे. यंदा दिवाळीपर्यंत सोन्याच्या भावात मोठी वाढ होईल, असा अंदाज होता.

- Advertisement -

जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या रिलीफ पॅकेज आणि कमी व्याज धोरणामुळे बाजारात पैसा वाढला आहे, त्यामुळे महागाईचा दर वाढत आहे. हे दीर्घकालीन सोन्याच्या किमतीला गती देण्यासाठी कार्य करू शकते. गुंतवणूकदार किमतींच्या घसरणीचा फायदा घेतील आणि त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्यातील गुंतवणूक वाढवतील. जेव्हा जेव्हा महागाई वाढते तेव्हा सोन्याची मागणीदेखील वाढते. लोक त्यांच्याकडील भांडवल सुरक्षित करण्यासाठी सोन्यातील गुंतवणूक वाढवतात. जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या रिलीफ पॅकेज आणि कमी व्याज धोरणामुळे बाजारात पैसा वाढला आहे. त्यामुळे महागाईचा दर वाढत आहे. ही बाब सोन्याच्या किमतीला दीर्घकालीन गती देण्यासाठी कार्य करू शकते. पूर्वानुभवानुसार अशा परिस्थितीत गुंतवणूकदार किमतींच्या घसरणीचा फायदा घेतात आणि त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्यातील गुंतवणूक वाढवतात. जेव्हा महागाई वाढते तेव्हा सोन्याची मागणीदेखील वाढते. लोक त्यांच्या भांडवलाचे रक्षण करण्यासाठी सोन्यातील गुंतवणूक वाढवतात. त्यामुळे आताच सोन्याची खरेदी करणे योग्य ठरणार आहे.

सोन्याच्या सध्याच्या किमती पाहता, आता सोन्यात गुंतवणूक करायची की थांबवायची, असा प्रश्न गुंतवणूकदार आणि दागिने खरेदी करणार्‍यांच्या मोठ्या वर्गासमोर आहे. ऑनलाईन सोने म्हणजे डिजिटल गोल्ड खरेदी करणार्‍यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. डिजिटल सोन्यामधील गुंतवणूक ही २४ कॅरेट सोन्यातील गुंतवणुकीचा आभासी प्रकार आहे. त्यासाठी, प्रत्यक्ष सोन्याची गरज नसते. गोल्ड ईटीएफ, गोल्ड बॉन्ड आणि गोल्ड फंड या तीन पद्धतींद्वारे डिजिटल सोन्यात गुंवणूक करता येते. महत्वाचे म्हणजे डिजिटल सोन्यातील गुंतवणूक एक रुपयानेही करता येते. आपण घरी बसून डिजिटल सोने खरेदी करु शकतो किंवा त्याची विक्रीही करु शकतो. बहुतांश ठिकाणी डिजिटल सोन्यातील गुंतवणुकीसाठी २ लाख रुपयांपर्यंतची मर्यादा आहे.

- Advertisement -

महत्वाचे म्हणजे सरकारने ग्राहकांची आणखी एक चिंता दूर केली आहे. सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकतात. या अ‍ॅपमध्ये वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तात्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबतची माहितीही लगेच मिळणार आहे. बाजार नियामक सेबीने गोल्ड एक्सचेंज निर्माण करण्याच्या प्रस्तावालाही मंजुरी दिलीय. यात सोन्याचे व्यवहार इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट म्हणजेच इजीआरद्वारे केले जाणार आहे.

भारतात सोन्याला महत्व असण्याची कारणेही यानिमित्ताने जाणून घेणे महत्वाचे ठरते. आपल्या देशात मुख्यत: बचत, गुंतवणूक, अलंकार व प्रतिष्ठा या अनेक कारणांसाठी सोन्याची खरेदी होते. आजमितीला भारतात सुमारे १० ते १३ हजार टन सोन्याचा साठा असून जागतिक उत्पादनापैकी सुमारे २५ टक्के सोन्याचा वापर एकट्या भारतात होतो. दरवर्षी केवळ ९ टनाच्या आसपास देशात उत्पादन होत असल्याने ६० टक्के सोन्याची आयात करण्यात येते. लंडन, न्यूयॉर्क, झुरिक, इस्तंबूल, दुबई, सिंगापूर, हाँगकाँग, टोकिओ, मुंबई ही सोन्याच्या व्यापाराची महत्वाची जागतिक केंद्रे असून त्यांपैकी हाँगकाँग, झुरिक, लंडन व न्यूयॉर्क ह्या सोन्याच्या बाजारपेठा दररोज २४ तास व्यापारासाठी खुल्या असतात. जगात सर्वांत जास्त सोने दक्षिण आफ्रिका आणि भारतात आढळते. भारतात २०२० मध्ये सोन्याची आयात वाढून ऑगस्टमध्ये ३.७ अब्ज डॉलर झाली आहे. जी मागील वर्षी याच महिन्यात १.३६ अब्ज डॉलरची होती.

चीननंतर भारत सोन्याचा दुसरा सर्वात मोठा आयातदार आहे. पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या तीन ते पाच वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या पाच वर्षांत १० ग्रॅम सोन्याचा दर ९० हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस तीन ते पाच हजार डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनानंतर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात. एकूणच, सोन्या-चांदीतली गुंतवणूक यंदा फायद्याची ठरू शकेल असे दिसते. मात्र तरीही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि आपली गरज आणि गुंतवणुकीतून असलेल्या अपेक्षा यांची सांगड घालून निर्णय घेणे केव्हाही अधिक योग्य ठरेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -