घरसंपादकीयदिन विशेषभारताचे दुसरे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत

भारताचे दुसरे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत

Subscribe

गोविंद वल्लभ पंत यांचा आज स्मृतिदिन. गोविंद पंत हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते व भारताचे दुसरे गृहमंत्री होते. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १८८७ रोजी अलमोडा येथे झाला. पंतांनी अलमोडा येथेच मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले. पुढे ते अलाहाबाद येथील म्यूर सेंट्रल कॉलेजमधून बी. ए. झाले (१९०७) व नंतर एल.एल.बी. झाले (१९०९). या परीक्षेत पहिला क्रमांक आल्यामुळे त्यांना लॅम्सडेन सुवर्णपदक मिळाले. विद्यार्थीदशेत त्यांच्यावर गोपाळ कृष्ण गोखले व पंडित मदन मोहन मालवीय या दोन देशभक्तांच्या विचारांचा परिणाम झाला. त्यांनी नैनिताल येथे प्रथम वकिलीस सुरुवात केली.

वकिलीच्या व्यवसायात त्यांनी प्रतिष्ठा व पैसा दोन्ही मिळविले. आपल्या प्रदेशातील मागासवर्गीय जातिजमातींचे प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच त्यांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी कुमाऊँ परिषदेची स्थापना केली (१९१६). कुमाऊँ प्रदेशातील सार्वजनिक चळवळीत भाग घेऊन त्यांनी भिकार्‍यांची व्यवस्था, मजुरांची सक्तीने भरती, जंगलवासीयांवरील अत्याचार इत्यादी प्रश्न कुमाऊँ परिषदेतर्फे हाताळले. यावेळी कुमाऊँ प्रदेश अनुसूचित जातीजमातींच्या विभागात अंतर्भूत केला होता.

- Advertisement -

म्हणून त्यांनी साउथबरोच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मताधिकार समितीसमोर योग्य तो पुरावा सादर करून कुमाऊँ प्रदेश या विभागातून वेगळा करण्यात संपूर्ण यश मिळविले. उत्तर प्रदेशाच्या विधान परिषदेत ते निवडून आले (१९२३). महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत सहभागी झाल्याने त्यांना १९३०-३२ च्या दरम्यान दोन वेळा तुरुंगवास घडला. गोविंद पंत हे एक खंबीर नेते होते, ते कमी बोलत. त्यांचा भर प्रत्यक्ष कृतीवर असे. भारतातील सर्वांत मोठ्या घटकराज्याचे ते दीर्घ काळ मुख्यमंत्री होते. आपल्या कारकीर्दीत प्रशासनव्यवस्थेत त्यांनी अनेक आमूलाग्र सुधारणा केल्या. अशा या महान नेत्याचे ७ मार्च १९६१ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -