घरसंपादकीयदिन विशेषभारतीय प्रजासत्ताक दिन

भारतीय प्रजासत्ताक दिन

Subscribe

भारतीय प्रजासत्ताक दिन भारतामध्ये आणि जगभर जिथे भारतीय आहेत तिथे दरवर्षी २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारताला ब्रिटिश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र भारताला तेव्हा स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या १९३५ सालच्या कायद्यावर (कलमावर) आधारित होते. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली.

या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे ४ नोव्हेंबर १९४७ रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव १६६ दिवसांसाठी खुला केला आणि २ वर्षं, ११ महिने आणि १८ दिवसांच्या कालावधीनंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बराच विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या ३०८ सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) २४ जानेवारी १९५० रोजी स्वाक्षरांकित केल्या. २६ जानेवारी १९५० रोजी हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा साजरा करण्यात येऊ लागला.

- Advertisement -

दर वर्षी २६ जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत, नवी दिल्ली येथे, एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवशी शाळा महाविद्यालयांमध्ये ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांच्या भाषणांचे आयोजन केले जाते. ब्रिटिशांच्या राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात याच दिवशी केली, त्यामुळे या दिवसाचे भारतीयांसाठी विशेष महत्व आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -