घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखै मना । तरी शांति केवीं अर्जुना । आपु होय ॥
अर्जुना, स्थिरपणाची भावना त्याच्या अंतःकरणात मुळीच उत्पन्न होत नसेल, तर त्याला शांती कशी प्राप्त होणार?
जेथ शांतीचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं । जैसा पापियाच्या ठायीं । मोक्षु न वसे ॥
पाप्याकडे मोक्ष जसा ढुंकूनही पाहत नाही, त्याप्रमाणे जेथे शांतीचा लेशही नाही, तेथे सुख चुकूनदेखील जात नाही.
देखैं अग्निमाजीं घापती । तियें बीजें जरी विरुढती । तरी अशांता सुखप्राप्ती । घडों शके ॥
हे पहा, जर विस्तवात घातलेली धान्याची बीजे उगवली तरच शांतीहीन मनुष्याला सुखप्राप्ती घडू शकेल.
म्हणौनी अयुक्तपण मनाचें । तेंचि सर्वस्व दुःखाचें । या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥
म्हणून मनाचे नियमन न करणे हेच दुःखाचे कारण आहे; याकरिता इंद्रियनिग्रह अवश्य करावा.
इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती । ते तरलेचि न तरती । विषयसिंधु ॥
जे पुरुष इंद्रियाच्या इच्छेप्रमाणे वागतात, ते या विषयरूप समुद्रातून आपण तरलो आहोत असे समजत असले तरी खरोखर तरत नाहीत,
जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता । तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ॥
ज्याप्रमाणे एखादी नाव किनार्‍यावर टेकते न टेकते तोच जर वादळ उत्पन्न झाले तर चुकवून आलेल्या आपत्तीमध्ये परत सापडते.
तैसी प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें । तरी आक्रमिला जाण दु:खें । संसारिकें ॥
त्याप्रमाणे सिद्ध म्हणजे कृतार्थ होण्याच्या बेतात आलेल्या पुरुषाने जरी कौतुकाने इंद्रियाचे लालन केले, तरी तो संसार दु:खांनी व्यापला जातो, असे समज.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -