घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंठा । तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥
ते संत ज्ञानाचे घर असून सेवाधर्म हा त्या घराचा उंबरठा आहे; तर अर्जुना, तू तिकडे वळून सेवाधर्मरूपी उंबरठा आपल्या स्वाधीन करून घे.
तरी तनुमनुजीवें । चरणांसीं लागावें । आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ॥
म्हणजे संताची सेवा कर ती म्हणशील तर शरीराने, मनाने व जीवाने सर्व प्रकारांनी गर्वरहित होऊन चरणाची सेवा करावी.
मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें जेणें अंतःकरण बोधलें । संकल्पा नये ॥
अशा प्रकारच्या सेवेने प्रसन्न झाल्यानंतर त्या प्रसन्नास्थितीत त्यांना शिष्यांनी जन्ममरण, दुःखरूप संसार व निवृत्ती याविषयी प्रश्न केला असता तेहि कृपेने उपदेश करितात. त्या उपदेशापासून होणार्‍या बोधाचे ऐश्वर्य असे आहे की, शिष्याच्या अंतःकरणात संसाराची कल्पना पुन्हा येत नाही.
जयाचेनि वाक्य उजिवडें । जाहलें चित्त निधडें । ब्रह्माचेनि पाडें । नि:शंकु होय ॥
ज्यांच्या उपदेशापासून ब्रह्माप्रमाणे निःसंशय व निर्धास्त अंत:करण ज्या वेळेस होईल,
ते वेळीं आपणपेयां सहितें । इयें अशेषेंही भूतें । माझ्या स्वरूपीं अखंडितें देखसी तूं ॥
त्या वेळी आपणासह वर्तमान सर्व भूते माझ्या अखंड स्वरूपाच्या ठिकाणी तू पाहशील.
ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारु जाईल । जैं गुरुकृपा होईल । पार्था गा ॥
पार्था, अशा रीतीने जेव्हा संताची कृपा होईल, तेव्हा तुझे अंतःकरणात ज्ञानाचा उदय होऊन मोहरूपी अंधार नाहीसा होईल.
जरी कल्मषाचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु । व्यामोहाचा डोंगरु । होऊनी अससी ॥
तू पातकाचा अगर, भ्रांतीचा समुद्र अथवा भ्रमाचा पर्वत जरी असलास,
तर्‍ही ज्ञानशक्तिचेनि पाडें । हें आघवेंचि गा थोकडें । ऐसें सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानीं इये ॥
तरी ज्ञानाच्या शक्तीपुढे हे सर्व तुच्छ आहे; असे या ज्ञानाच्या अंगी उत्तम सामर्थ्य आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -