घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

परि हें असो आतां प्रस्तुत । ऐकें यापरी ते दीक्षित । यजूनि मातें याचित । स्वर्गभोगु ॥
परंतु हे आता राहू दे. याप्रमाणे ते दीक्षित माझे यजन करून स्वर्गभोगाची इच्छा करितात.
मग मी न पविजे ऐसें । जें पापरूप पुण्य असे । तेणें लाधलेनि सौरसें । स्वर्गा येती ॥
मग ज्या पुण्याने मी पावणार नाही असे पापरूप पुण्य प्राप्त करून हौसेने स्वर्गी जातात.
जेथ अमरत्व हें सिंहासन । ऐरावतासारिखें वाहन । राजधानीभुवन । अमरावती ॥
जेथे अमरत्व हेच सिंहासन, ऐरावतासारखे वाहन, अमरावती हे राजधानीचे शहर.
जेथ महासिद्धींचीं भांडारें । अमृताचीं कोठारें । जिये गांवीं खिल्लारें । कामधेनूंचीं ॥
जेथे अष्टमहासिद्धीची भांडारे आहेत, अमृताची कोठारे आहेत व ज्या गावात कामधेनूची खिल्लारे आहेत.
जेथ वोळगे देव पाइका । सैंघ चिंतामणीचिया भूमिका । विनोदवनवाटिका । सुरतरूंचिया ॥
जेथे देवांच्या चाकरांना वागण्याकरिता सर्वत्र चिंतामणीच्या वाटा आहेत व करमणुकीच्या लहान लहान बागा कल्पतरूच्या आहेत.
गंधर्व गात गाणीं । जेथ रंभेऐशिया नाचणी । उर्वसी मुख्य विलासिनी । अंतौरिया ॥
जेथे गंधर्व गायन करीत आहेत, रंभेसारख्या नृत्य करणार्‍या आहेत व विलासिनी स्त्रियांत जेथे उर्वशी मुख्य आहे.
मदन वोळगे शेजारें । जेथ चंद्र शिंपे सांबरें । पवनाऐसे म्हणियारे । धांवणें जेथ ॥
ज्या ठिकाणी मदन सेजघरात चाकरी करितो आहे, चंद्र सडासंमार्जन करितो आहे व वायूसारखे म्हटल्याबरोबर धावणारे चाकर आहेत.
पैं बृहस्पती मुख्य आपण । ऐसे स्वस्तीश्रियेचे ब्राह्मण । ताटियेचे सुरगण । बहुवस जेथें ॥
जेथे इंद्राला आशीर्वाद देणारा बृहस्पतीसारखे मुख्य ब्राह्मण आहेत व जेथे स्तुतिपाठक हजारो देव आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -