घरमनोरंजनज्येष्ठ कलावंत निळू फुले यांच्या स्मृतीदिना निमित्ताने

ज्येष्ठ कलावंत निळू फुले यांच्या स्मृतीदिना निमित्ताने

Subscribe

ज्येष्ठ कलावंत निळू फुले यांचा आज १० वा स्मृतीदिन आहे. पुण्यात वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन हे अन्ननलिकेच्या कर्करोगामुळे झाले होते.

मराठी रंगभूमीवर नायक ते खलनायक असा प्रवास करणारे ज्येष्ठ कलावंत निळूभाऊ फुले यांचा आज १० वा स्मृतीदिन आहे. १३ जुलै २००९ रोजी त्यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. निळू फुलेनी स्वतःच्या रांगड्या आवाजाने ४० वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

निळूभाऊचा जन्म हा पुण्यामध्ये २५ जुलै १९३० साली झाला. अत्यंत सामान्य कुटुंबात निळूभाऊ यांचा जन्म झाला. त्यांचे वडिल हे भाजी विक्रेत होते. त्याच्या वडिलांनी त्यांचे मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या उद्यानात निळू फुले यांनी माळी म्हणून काम केलं. लहानपणापासून अभिनयाची आवड असल्यामुळे ते पुढे अभिनय क्षेत्राकडे वळले.

- Advertisement -

निळूभाऊ लहानपणापासून राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात वाढलेले असल्यामुळे ते कट्टर लोहियावादी होते. ८० रुपये पगारातील दहा रुपये ते दर महिन्याला राष्ट्रसेवा दलाच्या कार्यासाठी देत असतं. या दरम्यान त्यांना पु. ल. देशपांडे आणि वसंत बापट यांचा संपर्क झाला. १९५७ मध्ये पहिल्यांदा ‘येरागबाळ्याचे काम नोहे’ या लोकनाट्यात निळू फुले यांनी काम केलं. पु. ल. देशपांडे यांच्या ‘पुढारी पाहीजे’ या नाटकात त्यांनी ‘रोंगे’ ही भूमिका केली.

मराठी चित्रपटसृष्टीत त्यांनी ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. सलग ४० वर्ष निळू फुलेनी चित्रपटसृष्टीत काम केलं. १४० पेक्षा अधिक चित्रपट आणि १२ हिंदी चित्रपटांतून त्यांनी काम केलं. ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’, ‘थापाड्या’, ‘सिंहासन’, ‘सामना’, ‘शापित’, ‘नरम गरम’, ‘जखमी शेर’ यासारख्या अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटातील त्यांच्या भूमिका अजरामर आहेत. महाराष्ट्र सरकारने निळू फुले यांना ‘उत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार तीन वेळा दिला. तसेच संगीत नाटक अकादमी, अनंतराव भालेराव पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले.

- Advertisement -

‘तुला पाहते रे’ या मालिकेतील ईशाच्या आईची व्यक्तीरेखा साकारणाऱ्या गार्गी फुले-थत्ते या निळू फुले यांच्या कन्या आहेत. अन्ननलिकेच्या कर्करोगामुळे १३ जुलै २००९ रोजी निळू फुले यांचे पुण्यात निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -