घरमनोरंजनमराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच झळकले 16800 फुटाचे होर्डिंग

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच झळकले 16800 फुटाचे होर्डिंग

Subscribe

प्रवीण तरडे दिग्दर्शित बहुचर्चित चित्रपट ‘धर्मवीर मु.पो.ठाणे’ हा येत्या 13 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या या चित्रपटाने, चित्रपटाचे प्रमोशन करण्याची कोणतीच कसर सोडलेली नाही. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी संपूर्णपणे सज्ज झाला आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित असून जनसामान्यांचा नेता नाही तर जनसामान्यांचा आधार अशी कीर्ती असलेले आणि आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी खर्ची घालणारे ‘लोककारणी’ धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावर चित्रीत करण्यात आला आहे.

या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाबाबत समोर प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. या चित्रपटाचे अनेक पोस्टर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे चित्रपटाच्या प्रसिद्धीत भर पडली आहे. अशी गोष्ट मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये किंवा जाहिरात तंत्रात कधीच घडली नव्हती.

- Advertisement -

या ठिकाणी लावण्यात आले धर्मवीर चित्रपटाचे 16800 स्क्वेअर फुटाचे होर्डिंग

 

View this post on Instagram

 

A post shared by Dharmaveer (@dharmaveerofficial)

- Advertisement -

मुंबईतील वांद्रे भागातील पश्चिम द्रुतगती मार्गावर आशिया खंडातील सर्वात मोठ्या आकाराचे 16800 स्क्वेअर फुटाचे होर्डिंग लावण्यात आले आहे. या होर्डिंगवर आजपर्यंत एकही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. हे रेकॉर्ड आता धर्मवीर चित्रपटाने मोडून काढले आहे. सध्या सर्वत्र याचं होर्डिंगची चर्चा सुरू आहे.

झी स्टुडिओज निर्मिती आणि प्रविण तरडे यांच्या लेखन आणि दिग्दर्शनात बनलेला ‘धर्मवीर मु.पो. ठाणे’ हा चित्रपट येत्या 13 मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

 


हेही वाचा :दीपिका देणार गूड न्यूज, होणाऱ्या बाळाबद्दल रणवीर म्हणाला….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -