दीपिका देणार गूड न्यूज, होणाऱ्या बाळाबद्दल रणवीर म्हणाला….

अभिनेता रणवीर सिंहने नुकत्याच देलेल्या एका इंटरव्यूमध्ये एक खुलासा केला आहे. रणवीर सिंहने त्याच्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाच्या ट्रेलर वर दीपिकाने दिलेल्या प्रतिक्रियेबाबत खुलासा केला आहे. तसेच रणवीरने सांगितलं की, त्याने त्याच्या मुलांच्या नावाची एक मोठ्ठी लिस्ट बनवली आहे. मात्र तो याचा खुलासा करू इच्छित नाही.

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या मुलांची नावं

रणवीरचा आगामी चित्रपट कन्या भ्रूण हत्या आणि लिंग भेदभावावर आधारित आहे. जेव्हा त्यांना एखादे मुलगी झाल्यावर ते त्या मुलीचे नाव काय ठेवतील? तेव्हा रणवीर लगेच म्हणाली की, त्याला मुलांच्या नावांची आवड आहे. शिवाय दीपिका आणि तो मुलांच्या नावावर चर्चा करत असतात. रणवीर असं देखील म्हणाली की, तो या नावांबाबत थोडा सीक्रेटिव आहे, कारण ते समजल्यावर लोक ते चोरतील याची मला भिती वाटते.

रणवीरला मुलगा हवा की मुलगी?

काही दिवसांपूर्वी रणवीरला विचारण्यात आलं होतं की, त्याला मुलगा हवा की मुलगी? तेव्हा रणवीरने उत्तर दिले की, ही त्याची आवड नाही आहे आणि मुलगा असो किंवा मुलगी ते मुल दीपिका आणि त्याच्यासाठी अनमोल असेल. दरम्यान काही दिवसांपूर्वी दीपिका पादुकोणच्या प्रेग्रेंसीबाबत खोट्या अफवा पसरल्या होत्या. परंतु याबाबत दीपिका आणि रणवीरने कोणतीच घोषणा केली नाही.

रणवीर सिंहचा आगामी चित्रपट

रणवीर सिंह गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘जयेशभाई जोरदार’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रचार करत आहे. हा चित्रपट कन्या भ्रूण हत्या आणि लिंग भेदभावावर आधारित आहे. दिव्यांद ठक्कर दिग्दर्शित हा चित्रपट १३ मे रोजी रिलीज होणार आहे. शालिनी पांडे, रत्ना पाठक शाह आणि बोमन ईरानी हे सुद्धा या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येतील. शिवाय या चित्रपटानंतर रणवीरचे ‘सर्कस’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हे चित्रपट सुद्धा येणार आहेत.

 


हेही वाचा :प्रियांका निकच्या लाडक्या लेकीला 100 दिवसांनंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज