…तर राणा दाम्पत्या विरोधात मी निवडणूक लढवेन – अब्दुल सत्तार

Abdul Sattar contest election against Rana couple
Abdul Sattar contest election against Rana couple

शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना थेट आव्हान दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला आदेश दिला, तर मी अमरावतीत जाऊन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरोधात निवडणूक लढेन, असे अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

राणे चार आणेसारखी गोष्ट करत आहेत. चार आणेवाला इतक्या मोठ्या डोंगराला आव्हान करत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जे बोलले ते त्यानी केले आहे. त्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून देशात नाव आहे. काही लोकांनी बोलण्यासाठी विषय पाहिजे, म्हणून ते अशा विषयांवर बोलतात. मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिला तर मी अमरावतीत जाऊन नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवेन असे अब्दुल सत्तार म्हणाले.

राणा दाम्पत्य कधी आरक्षणाची गोष्ट करतात, कधी मागासवर्गीयांवर अन्यायाचा मुद्दा उपस्थित करतात. जाती धर्माची नावे घेऊन राजकारण करणे सोपे आहे. राणा दाम्पत्य भाजपाची सुपारी घेऊन बोलत आहेत. त्याचे उत्तर आम्ही निश्चित देऊ, असे मत अब्दुल सत्ता यांनी व्यक्त केले.