घरमनोरंजनदेसी गर्लच्या लग्नासाठी '3D' रोषणाई; व्हिडिओ व्हायरल

देसी गर्लच्या लग्नासाठी ‘3D’ रोषणाई; व्हिडिओ व्हायरल

Subscribe

देसी गर्ल आणि निकच्या ग्रँड वेडिंगसाठी उमैद भवनावर थ्री-डी लाईट्सची रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला एखाद्या राजवाड्याचे स्वरुप आले आहे.

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोन्स यांचं लग्न अवघ्या चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. प्रियांका आणि निकचे जगभरातील चाहते आणि संपूर्ण सिनेसृष्टी या ग्रँड वेंडिंगसाठी उत्सुक आहेत. जोधपूर येथील उमैद भवन पॅलेसमध्ये प्रियांका आणि निकचा शाही विवाह सोहळा पार पडणार असून, या सोहळ्यासाठी उमैद भवनावर रोषणाई करण्यात आली आहे. आकर्षक सजावट आणि रोषणाईने सजलेल्या उमैद भवनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. उमैद भवनावर थ्री-डी लाईट्सची रोषणाई केल्यामुळे त्याला एखाद्या राजवाड्याचे स्वरुप आले आहे. तिकडे उमैद भवनाचा हा थाट असताना इकडे मुंबईमध्येही प्रियांकाचं घर सजवण्यात आलं आहे. प्रियांकाच्या मुंबईतील घराचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या दोन्ही व्हिडिओंना नेटिझन्सकडून भरभरुन पसंती मिळते आहे. लग्नाच्या पार्श्वभूमीवर उमैद भवन आणि प्रियांकाचं मुबंईतील घर रोषणाईमध्ये नाहून निघालं आहे. पाहाणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटेल अशी जबरदस्त रोषणाई आणि सजावट या दोन्ही ठिकाणी करण्यात आली आहे. येत्या २ डिसेंबरला प्रियांका आणि निक आपली लग्नगाठ बांधणार आहेत. त्यानंतर भारतीय आणि ख्रिश्चन अशा दोन पद्धतीने त्यांचं वेडिंग रिसेप्शन पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उमैद भवनाचा शाही थ्रीडी लूक


प्रियांकाचं राहतं घरही सजलं…

- Advertisement -

३० नोव्हेंबरपासून प्रियांका-निकच्या लग्न सोहळ्याला सुरुवात होणार आहे.  बॉम्बे टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबर रोजी मेहंदी आणि संगीत समारंभ होणार असून ३० तारखेला कॉकटेल पार्टी दिली जाणार आहे. तर १ डिसेंबर रोजी हळद आणि २ तारखेला दोघांचं लग्न असा कार्यक्रम असणार आहे. आधी हिंदू पद्धतीने लग्न सोहळा होणार असून ३ डिसेंबर रोजी ख्रिश्चन पद्धतीने दोघं लग्न करणार आहेत. दोन्ही लग्न पद्धती एकाच सभागृहात होणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -