मीरा जगन्नाथ, जय दुधाणे यांचा होळी पौर्णिमेनिमित्त खास म्युझिक व्हिडिओ

‘इश्काचं तुफान उठलंय गो, दर्याला वादल सुटलंय गो’ असं म्हणत मीरा जगन्नाथ आणि जय दुधाणे ही जोडी म्युझिक व्हिडिओमध्ये पुन्हा एकत्र एकत्र आली आहे. खास होळी पौर्णिमेनिमित्त सप्तसूर म्युझिकनं ‘जीव रंगलाय गो’ हा नवाकोरा म्युझिक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलद्वारे सादर केला असून, या म्युझिक व्हिडिओला प्रेक्षकांची उत्तम पसंती मिळत आहे.

सप्तसूर म्युझिकचे साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी ‘जीव रंगलाय गो’ या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. अशोक काजळे, अर्चना कराले यांनी लिहिलेल्या या गीताला अशोक काजळे यांनी संगीतबद्ध केलं आहे. सिद्धी तुरे आणि अशोक काजळे यांनी हे गाणं गायलं आहे.. कृतिक माझिरे यांनी नृत्य दिग्दर्शनाची जबाबदारी निभावली आहे. बिग बॉस या रिअॅलिटी शोचा उपविजेता जय दुधाने आणि याच शोमधील स्पर्धक मीरा जगन्नाथ सप्तसूर म्युझिकच्याच ‘जोडी दोघांची दिसते चिकनी’ या म्युझिक व्हिडिओमध्ये पहिल्यांदा एकत्र आले होते. त्या म्युझिक व्हिडिओला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली होती. त्यानंतर आता ‘जीव रंगलाय गो’ या म्युझिक व्हिडिओत त्यांची जोडी पुन्हा पाहायला मिळणार आहे.

होळी हा सण कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.दशावतारातील पात्र शिमग्याची सोंग घेऊन फिरताना दिसतात त्यामुळे नयनरम्य कोकण, कोकणातील वैशिष्ट्यपूर्ण संस्कृतीच्या पार्श्वभूमी ‘जीव रंगलाय गो’ हा म्युझिक व्हिडिओ साकारला आहे. अतिशय श्रवणीय गीत, उत्तम छायाचित्रण, जय आणि मीरा यांची फ्रेश जोडी असलेला हा म्युझिक व्हिडिओ नक्कीच सर्वांना आवडेल यात शंका नाही.


हेही वाचा :

ऑस्ट्रेलियात स्नेहल तरडेंची महिलादिनानिमित्त 15 हजार फुटांवरून उडी!