Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन अमिर खानचा मुलागा जुनैद खान रुपेरी पडद्यावर येण्यास होतोय सज्ज

अमिर खानचा मुलागा जुनैद खान रुपेरी पडद्यावर येण्यास होतोय सज्ज

मुंबई मधील मरोल विभागात 'महाराजा' सिनेमाचा सेट तर करण्यात आला आहे. 100 पेक्षा अधिक लोक शूटिंग मध्ये उपस्थित आहेत.

Related Story

- Advertisement -

अभिनेता आमिर खानचा (Aamir Knan) मुलगा जुनैद खान (Junaid Khan) बॉलिवूड मध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी त्याने  बरीच मेहनत केली आहे. जुनैदने स्वत: मध्ये खूप मोठा बदल घडवून आणला आहे. जुनैद ‘महाराजा’ (Maharaja) सिनेमातून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. आदित्य चोपडाच्या बॅनर अंतर्गत तयार होणार्‍या सिनेमाच्या शूटिंगची संपूर्ण तयारी झाली आहे. राज्य सरकारने आखून दिलेल्या नियमावली अंतर्गत चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. चित्रीकरणाशी संबंधित असलेले कलाकार, तंत्रज्ञ, इतर कर्मचाऱ्यांना ‘बायोबबल’ वातावरणातच राहणे बंधनकारक करण्यात आलं आहे .तसेच अधिकाधिक कलाकारांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे.  नियमांचे पालन करत 8 तास निर्धारीत वेळेत शूटिंग करण्यात येणार आहे.बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार मुंबई मधील मरोल विभागात ‘महाराजा’ सिनेमाचा सेट तर करण्यात आला आहे. 100 पेक्षा अधिक लोकं  शूटिंग मध्ये उपस्थित आहेत. आवश्यक खबरदारी बाळगत  शूटिंग करण्यात येत आहे.

काय आहे चित्रपटाची कथा –

- Advertisement -

‘महाराजा’ एक पीरियड ड्रामा फिल्‍म आहे. तसेच ही कथा 1862 सालची असून महाराजा लिबेल केस (Maharaj Libel Case) वर आधारित आहे. महाराज लिबेल केस ब्रिटिश भारत मधील बॉम्बे कोर्ट मधील केस आहे. यामध्ये अनेक धार्मिक नेत्यांनी नानाभाई रुस्तमजी रैनीना आणि पत्रकार करसनदास मुलजी तसेच त्यांच्या वृत्तपत्र विरोधात केस केली होती.यामध्ये जुनैद पत्रकार करसनदास मुजली हे पात्र सकारणार आहे. बॉलिवूड मधील मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून संबोधला जाणारा अभिनेता अमिर खानचा मुलगा जुनैद पडद्यावर काय कमाल करून दाखवतो हे पाहणे रंजक ठरेल


हे हि वाचा – PearlVPuriCase:दिव्‍या खोसला कुमारने पीडितेची माहिती केली उघड!

- Advertisement -