घरमनोरंजन‘व्हिलेज रॉकस्टार’ची ऑस्करवारी!

‘व्हिलेज रॉकस्टार’ची ऑस्करवारी!

Subscribe

ऑस्कर पुरस्कारासाठी आसामी 'व्हिलेज रॉकस्टार' या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. रिमा दास यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. आतापर्यंत ४४ पुरस्कार या चित्रपटाने पटकावले आहेत.

ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून अधिकृत नावाची घोषणा करण्यात आली आहे. आसामी भाषेतील चित्रपट ‘व्हिलेज रॉकस्टार’ची भारताकडून निवड करण्यात आली आहे. ‘व्हिलेज रॉकस्टार’ हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता आसामी चित्रपट आहे. यावर्षीचा बेस्ट फीचर फिल्म पुरस्कार या चित्रपटाला मिळाला होता. ‘पद्मावत’, ‘राजी’, ‘पिहू’, ’कडवी हवा’, ‘न्यूड’ या चित्रपटांना मागे टाकत ‘व्हिलेज रॉकस्टार’ या चित्रपटाने ऑस्करसाठी बाजी मारली आहे.

चित्रपटाच्या खात्यात अनेक पुरस्कार

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शनिवारी या चित्रपटाच्या नावाची घोषणा केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन रीमा दास यांनी केलं आहे. हा चित्रपट ७०हून अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाने चार राष्ट्रीय पुरस्कारांसह ४४ पुरस्कार पटकावले आहेत. तर या चित्रपटातील बाल कलाकार भनिता दास हिला सर्वोत्कृष्ट बाल कलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. मल्लिका दास यांना बेस्ट लोकेशन साऊंड रिकॉर्डिस्टचा पुरस्कार मिळाला आहे.

- Advertisement -

असा आहे ‘व्हिलेज रॉकस्टार’

‘व्हिलेज रॉकस्टार’ या चित्रपटात एका मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. संगीत क्षेत्रात नाव आपलं नाव कमावण्यासाठी धडपडणाऱ्या मुलीची ही गोष्ट आहे. तिला गिटारिस्ट बनायचं असतं. २८ सप्टेंबरला हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. तब्बल २९ वर्षांनी आसामी चित्रपटाची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. आता हा चित्रपट ऑस्करसाठी भारताचं प्रतिनिधित्व करायला सज्ज झाला आहे. यासाठी चित्रपटाच्या दिग्दर्शिका रीमा दास यांनी ट्वीट करत संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -