Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी मीसुद्धा कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार, अभिजित बिचुकलेंचा इशारा

मीसुद्धा कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार, अभिजित बिचुकलेंचा इशारा

Subscribe

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्न ऐरणीवर असताना या सगळ्या वादावर बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटक सीमावाद जर लवकर थांबवला नाही तर छत्रपती संभाजीराजे कर्नाटकात जाणार आहेत. त्यामुळे मीसुद्धा छत्रपती संभाजीराजेंसोबत कर्नाटकात जाणार आहे. तिथं जाऊन मी आंदोलन करणार आहे, असा इशारा अभिजित बिचुकले यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना दिला आहे.

महाराष्ट्रात आणि देशात घाणेरड्या प्रकारचं राजकारण केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात केंद्रात एकाच पक्षाचं सरकार आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागावा, असं अभिजित बिचुकले म्हणाले.

- Advertisement -

भाजपमधल्या काही लोकांना पंतप्रधानांचं स्वप्न पडलं असून ते आता मोदींना दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा मोदींना सल्ला काळजी घ्या, असं म्हणत बिचुकले यांनी पंतप्रधान मोदींना काळजीचा सल्ला दिला आहे.

सोशल मीडियावर बिचुकलेंची प्रतिक्रिया व्हायरल झाली आहे. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, कर्नाटक सीमावाद जर लवकर थांबवला नाही तर छत्रपती संभाजीराजे कर्नाटकात जाणार आहेत. केवळ जाणार नाही तर तिथे आंदोलनही करणार असल्याचे त्यानं म्हटले आहे.

- Advertisement -

राज्यातील आणि देशातील विकृत मनोवृत्तीची लोकं जाणीवपूर्वक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरत आहेत. मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. पण आम्ही ही असली वक्तव्य खपवून घेणार नाही, असंही बिचुकले म्हणाले.


हेही वाचा : हे तर षडयंत्र; दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता असताना विरोध का?, सुप्रिया सुळेंचा


 

- Advertisment -