घरताज्या घडामोडीKapil Sharma Show: कपिल शर्माच्या मंचावर अभिषेक उडवली अभिनेत्री चित्रांगदाची खिल्ली

Kapil Sharma Show: कपिल शर्माच्या मंचावर अभिषेक उडवली अभिनेत्री चित्रांगदाची खिल्ली

Subscribe

अभिनेता अभिषेक बच्चन सध्या त्यांच्या बॉब बिस्वास या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये स्वस्त आहे. सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिषेकने द कपिल शर्माच्या शोच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी अभिषेकचे मंचावरील कलाकारांनी जबरदस्त मनोरंजन केलं. अभिषेकसोबत अभिनेत्री चित्रांगदा देखील कार्यक्रमात उपस्थित होती.चित्रांगदा सोशल मीडियावर फार सक्रीय असते त्यावरुन तिला प्रश्न विचारण्यात आला त्यावर अभिषेकने चित्रांगदाची चांगलीच खिल्ली उडवली. शोचा एक प्रोमो रिलीज झाला आहे त्यात कपिल शर्माच्या शोमध्ये कलाकार फार मजा करताना दिसत आहेत.

चित्रांगदाच्या रिल्स वरुन तिला प्रश्न विचारल्यावर अभिषेक त्यावर ‘चित्रांगदा कुत्र्यांसोबत रिल्स करते’ असे म्हटले यावर सेटवर असलेल्या सगळ्या मंडळींना हसणे आवरले नाही. अभिषेक चित्रांगदा सह कपिल देखील पोट धरुन हसत होता.

- Advertisement -

प्रोमोमध्ये किकू शारदाने अभिषेक बच्चन आणि चित्रांगदाला डान्स देखील करायला सांगितला. अभिषेकने छान गाण गायलं त्यावर चित्रांगदाने सुंदर डान्स केला आहे. अभिषेक आणि चित्रांगदा एकत्र डान्स करताना किकू शारदा त्यांच्यमध्ये आल्यावर तिला ‘तू नागिन आहे’ असं म्हणत तिची चांगलीच खिल्ली उडवली आहे.

- Advertisement -

यावेळी कपिलने अभिषेकला काही मजेशीर प्रश्न देखील विचारले, लग्नाचे कॉन्ट्रँक्ट कोणाला देशील त्यावर अभिषेकने उत्तरात करण जोहर असे म्हटले. कपिलने विचारले लग्नाच्या कपड्यांचे कॉन्ट्रँक्ट त्यावर अभिषेकने हसू आवरत रणवीर सिंह असे उत्तर दिले. संपूर्ण एपिसोडमध्ये अभिषेकने कपिल शर्माच्या संपूर्ण टिमसोबत धम्माल केली आहे.


हेही वाचा – aarya 2: अभिनेता विकास कुमारने सांगितला आर्या२ मधील अनुभव

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -