घरमनोरंजनहॉरर कॉमेडी चित्रपटात झळकणार आता 'दगडू'

हॉरर कॉमेडी चित्रपटात झळकणार आता ‘दगडू’

Subscribe

मराठी बॉक्स ऑफिसवर तुफान गल्ला जमावणाऱ्या टाईमपास सिनेमाची आजही चर्चा होते. या सिनेमातील दगडू या पात्राला प्रेक्षकांनी अक्षश: डोक्यावर घेतले. दगडू या भूमिकेतून अभिनेता प्रथमेश परब याने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. त्यानंतर प्रथमेश आता ‘ओह माय घोस्ट’ या चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात प्रथमेश जग्गू नावाचे पात्र साकारणार आहे. जग्गू नावाच्या एका अनाथ युवकाची कथा या चित्रपटातून दर्शवण्यात येणार आहे. या कथेतून जग्गूच्या जीवनातील अपयश त्यानंतर आलेले नैराश्य आणि अशा मनस्थितीत असताना त्याला जग्गूला पडणारी भूताची स्वप्ने अशी एकंदरीत हॉरर कॉ़मेडी कथा या चित्रपटातून पाहता येणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

- Advertisement -

अलीकडे या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. ‘जम्पिंग टोमॅटो मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘फिल्मोशन पिक्चर्स’च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती सना वसिम खान आणि रोहनदीप सिंह यांनी केली आहे. हॉरर कॉमेडी असणारा हा चित्रपट १२ फेब्रुवारी २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात प्रथमेश परब, काजल शर्मा, पंकज विष्णू, कुरूस देबू, प्रेम गाढवी, दिपाली पाटील आणि अपूर्वा देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -