Ekta Kapoor: निर्माती एकता कपूरही Corona Positive, होम क्वारंटाईनचा निर्णय

एकता कपूरच्या आधी बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Producer Ekta Kapoor Corona Positive
Ekta Kapoor: निर्माती एकता कपूरही Corona Positive, होम क्वारंटाईनचा निर्णय

बॉलिवूडचा कोरोनाचा (Covid-19) धोका आणखी वाढत आहे. मागच्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात आले असून आता निर्माती एकता कपूरलाही कोरोनाची लागण झाली आहे (Ekta Kapoor corona positive)  एकताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. एकता कोरोनाची काही लक्षणे आढळल्याने त्वरित कोरोना चाचणी केली असता तिची चाचणी पॉझिटिव्ह आली. पॉझिटिव्ह असलेल्या एकता कपूरने  होम क्वारंटाईनचा निर्णय घेतला असून डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेत आहे. एकताने तिच्या सानिध्यात आलेल्या सर्वांना कोरोनाचा चाचणी करुन घेण्याची विनंती केली आहे त्याचप्रमाणे सर्वांनी कोरोनाची नियम पाळा असे आवाहन देखील केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor)


एकता कपूरच्या आधी बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचाल देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. जॉन तीन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्याला आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली आता दोघेही घरीच क्वारंटाइन आहेत. जॉन आणि रुंचाल यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे मात्र तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली. दोघांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत.

 

एकता कपूर आणि जॉन अब्राहम यांच्या आधी डिसेंबर महिन्यात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी कोरोनाच्या विळख्यात आले. अभिनेत्री करिना कपूरला सर्वात आधी कोरोनाची लागण झाली. त्यानंतर अमृता अरोरा, अर्जुन कपूर, रिया कपूर, करण बुलानी,मृणाल ठाकूर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. करिना कपूर ही बॉलिवूडमधील कोरोनाची सुपरस्प्रेडर ठरली असल्याचे सांगितले जात आहे. करण जोहरच्या पार्टीत करिनाला कोरोनाची लागण झाली आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे.

 

निर्माती एकता कपूर हिच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाले तर ३ जानेवारीला एकता कपूरची अपकमिंग नागिन 6 या मालिकेचा टीझर रिलीज झाला आहे. ३० जानेवारीला मालिका ऑन एअर होणार आहे. २०२२मध्ये एकता कपूरचे अनेक शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. मात्र एकताला कोरोनाची लागण झाल्याने तिचे पुढचे शो पुढे ढकलण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – Coronavirus : जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रुंचालला कोरोनाची लागण