घरताज्या घडामोडीशेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर अभिनेत्रीला कोरोनाचा संसर्ग

शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर अभिनेत्रीला कोरोनाचा संसर्ग

Subscribe

हिंदी बिग बॉस (Bigg Boss) मधील एक्स कंटेस्टेंट आणि पंजाबी अभिनेत्री हिमांशी खुरानाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.

View this post on Instagram

🙏🙏

A post shared by Himanshi Khurana 👑 (@iamhimanshikhurana) on

- Advertisement -

हिमांशी खुरानाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छित आहे की, संपूर्ण खबरदारी घेतल्यानंतरही मला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दोन दिवसांपूर्वी मी शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले होते. हे तुम्हा सर्वांना माहितीच आहे. त्या ठिकाणी खूप गर्दी होती. आज शूटिंगला जाण्यापूर्वी मला टेस्ट करावी असे वाटले. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी आपली टेस्ट करू घ्या आणि आंदोलन दरम्यान पूर्ण सावधानगिरी बाळगा. जे लोकं आंदोलन करत आहे, त्यांना मी विनंती करते की, त्यांनी आपण महामारीतून जात आहोत हे विसरू नका. म्हणून कृपया स्वतःची काळजी घ्या.’

हिमांशीच्या या पोस्टला खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. मागील दिवसांत हिमांशी खुराना बऱ्याच गाण्याच्या अल्बममध्ये दिसली आहे. काही दिवसांपूर्वीच हिमांशी आणि असिम रियाझ या दोघांच ‘दिल को मैंने दी है कसम’ हे गाणं रिलीज झालं होत. त्यांच्या चाहत्यांना हे गाणं खूप आवडलं. यापूर्वी देखील हिमांशी आणि असिम सोबतची ‘ख्याल रख्या कर’ आणि ‘कल्ला ही सोना नई’ ही दोन गाणी रिलीज झाली होती. बिग बॉस १३ मध्ये हिमांशी आणि असिमची जोडी चांगलीच चर्चेत आली होती.

- Advertisement -

हेही वाचा – कृषी विधेयकावर अखेर पंतप्रधान बोलले… दिलं महाराष्ट्राच उदाहरण


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -