घरताज्या घडामोडीLata Mageshkar : लता दीदींच्या जाण्याने आशा ताईंना जबर धक्का - पद्मिनी...

Lata Mageshkar : लता दीदींच्या जाण्याने आशा ताईंना जबर धक्का – पद्मिनी कोल्हापूरे

Subscribe

दीदींचे निधन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आशा ताईंनी सोशल मीडियावर दीदींसोबतचा फोटो शेअर त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता.

Lata Mageshkar : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे ६ फेब्रुवारी रोजी मुंबईत निधन झाले. वयाच्या ९३व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुख:चा डोंगर कोसळला आहे. लता दीदींच्या पश्चात त्यांच्या तीन बहिणी आणि एक भाऊ आहेत. दीदींच्या जाण्याने त्यांची बहिण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जबर धक्का बसला असून त्या अजून धक्क्यातून बाहेर आलेल्या नाहीत, अशी माहिती मंगेशकर कुटुंबियांची नातेवाईक असलेल्या अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांनी दिली आहे. संवाद या वेब साइटने याबाबत वृत्त दिले आहेत.

आशा भोसले या लता दीदींच्या छत्रछायेत लहानाच्या मोठ्या झाल्यात. आशा ताईंचे दीदींवर विशेष प्रेम होते. दीदींची प्रकृती खालावल्यानंतर संपूर्ण मंगेशकर कुटुंबिय त्यांना भेटण्यासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झाले होते. लता दीदींना जाऊन आज पाच दिवस झाले असले तरी आशाताई त्या धक्क्यातून सावारल्या नाहीत अशी माहिती पद्मिनी कोल्हापूरेंनी दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Asha Bhosle (@asha.bhosle)

- Advertisement -

दीदींचे निधन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी आशा ताईंनी सोशल मीडियावर दीदींसोबतचा फोटो शेअर त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. आशा भोसले यांनी लता दीदींसोबतचा बालपणीचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. आशा भोसले यांनी फोटो शेअर करत म्हटले, ‘बालपणीचे दिवस किती छान होते. दीदी आणि मी’, असे म्हणत आशा ताईंनी दीदींवरील प्रेम व्यक्त केले होते.

- Advertisement -

लता दीदींवर दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीवर अत्यंसंस्कार करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी उपस्थित होते. दीदींचे भाऊ ह्रदयनाथ मंगेशकर यांनी दीदींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. गुरूवारी नाशिकमध्ये रामकुंड येथे दिदींच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.


हेही वाचा – Lata Mangeshkar Passes Away: तुम मुझे यूँ भुला ना पाओगे… गानसम्राज्ञी,…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -