Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आर्यन खानची टीव्ही अभिनेत्री रोशनी वालियासोबत पार्टी, ट्रोल झाल्यानंतर युझर्स म्हणाले असं काही...

आर्यन खानची टीव्ही अभिनेत्री रोशनी वालियासोबत पार्टी, ट्रोल झाल्यानंतर युझर्स म्हणाले असं काही…

Subscribe

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने नेहमीच आपल्या अभिनयातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहरुखच्या पठाण या सिनेमाने आणि त्यामधील गाण्याने लोकांवर भुरळ पाडली. मात्र, शाहरुखप्रमाणेच त्याचा मुलगा आर्यन खानचीही चांगली फॅन फॉलोइंग आहे. त्यामुळेच त्याची एक पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल होते. सध्या आर्यन खानची एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच तो ट्रोल देखील झाला आहे. युझर्सकडून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

आर्यन खान हा बी-टाऊनच्या स्टारकिड्सपैकी एक आहे. अलीकडेच त्याने मुंबईतील एका पार्टीला हजेरी लावली होती. त्याचे काही फोटोज टेलिव्हिजन अभिनेत्री रोशनी वालियाने शेअर केली आहेत. हे फोटो समोर येताच आर्यन खान नेहमीप्रमाणेच हसत नसल्याने प्रचंड ट्रोल झाला आहे.

- Advertisement -

आर्यन खान झाला ट्रोल

रोशनी वालियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. आर्यन खानसोबत तिने या पार्टीत काही फोटोज क्लिक केले आहेत. या पार्टीत आर्यन खान नेहमीप्रमाणेच स्टायलिश लूकमध्ये दिसला. मात्र या लूकनंतरही तो ट्रोल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Roshni Walia (@roshniwaliaa)

- Advertisement -

प्रवृत्ती काय आहे?

एका युझर्सने कमेंट केली आहे की, त्याच्या चेहऱ्यावर कधीच हसू दिसले नाही. काय वृत्ती आहे? तर दुसऱ्या युझर्सने म्हटलं आहे की, जेव्हा पैशाने आनंद विकत घेता येत नाही त्याबद्दलची ही अभिव्यक्ती आहेत. हा माणूस कधीच का हसत नाही.

दरम्यान, आर्यन खानने सध्या व्यवसाय आणि स्क्रिप्टिंगमध्ये पाऊल ठेवले आहे. त्याने त्याचा प्रीमियम व्होडका ब्रँड भारतात लॉन्च केला आहे. याशिवाय तो एका ओटीटी शोसाठी स्क्रिप्ट रायटर म्हणून पदार्पण करणार आहे.


हेही वाचा : राहुल गांधी हाच मुद्दा… पण विरोधकांच्या एकजुटीतून शिवसेना ‘आऊट’ अन् तृणमूल ‘इन’


 

- Advertisment -